• Wed. May 8th, 2024

राहुल गांधींनी भाजपला घेरले : ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावरून हल्लाबोल

Byjantaadmin

Sep 30, 2023

भाजप 10 वर्षांपासून सत्तेत असून, केंद्रातील 90 अधिकारी सरकार चालवत आहेत. या 90 अधिकाऱ्यांपैकी किती ओबीसी आहेत ? ओबीसींची लोकसंख्या किती आहे हे अद्याप कळलेले नाही, याचे कारण जात जनगणना झालेली नाही. त्यांची लोकसंख्या सुमारे पन्नास टक्के आहे आणि ९० पैकी फक्त तीन अधिकारी OBC आहेत. तीन वर्षांपूर्वी एकही ओबीसी अधिकारी नव्हता, असा दावा काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केला.मध्य प्रदेशातील शाजापूर येथे एका सभेमध्ये राहुल गांधी बोलत होते. त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिवराज सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “हा विचारधारेचा लढा आहे. एका बाजूला गांधी, तर दुसऱ्या बाजूला गोडसे आहेत. आपल्या भाषणात त्यांनी ओबीसी आणि जात जनगणनेवर भर दिला. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी जनगणना हा काँग्रेसचा प्रमुख मुद्दा असणार आहे, असे संकेतहीRAHUL GANDHI  यांनी या वेळी दिले.महिला आरक्षणातील त्रुटींकडे लक्ष वेधत राहुल गांधी म्हणाले, काही दिवसांपूर्वी भाजपने महिला आरक्षणावर चर्चा केली. महिला आरक्षणाबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केला, पण BJP  उत्तर दिले नाही.

आम्ही दोन गोष्टी बोललो, आम्ही म्हटले हे चांगले आहे आणि ते व्हायला हवे, पण तुम्ही त्यात दोन छोट्या ओळी लिहिल्या आहेत, त्या हटवा. महिला आरक्षण लागू करण्यापूर्वी सर्वेक्षण करण्याची गरज आहे, अशी ओळ आहे. दुसरी ओळ म्हणजे महिला आरक्षण लागू करण्यापूर्वी आपल्याला करावी लागणारी जनगणना, या दोन्ही कारणांमुळे 10 वर्षांनंतर महिला आरक्षण लागू होणार आहे. महिला आरक्षणात ओबीसी आरक्षण का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.महिला आरक्षणात ओबीसी आरक्षण का दिले नाही ? पंतप्रधान  MODI म्हणतात, भाजपमध्ये ओबीसींचे खासदार आणि आमदार आहेत, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की काँग्रेसचे तीन मुख्यमंत्री ओबीसी आहेत, आमची चार सरकारे आहेत. तुम्ही संसदेत जा आणि भाजपच्या आमदार-खासदारांना विचारा की कायदा करण्यापूर्वी त्यांना काही विचारले जाते का ? ते म्हणतील की आम्हाला विचारले जात नाही. 90 अधिकारी कायदे बनवून देश चालवतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *