• Sat. May 4th, 2024

ठरलं! 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार

Byjantaadmin

Nov 9, 2023

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिल्यानंतर, मनोज जरांगे तिसऱ्या टप्प्यात पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याला 15 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे.sambhaji nagar शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगेंनी आपल्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याचा वेळापत्रक जाहीर केला आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात त्यांनी सरकारवर गंभीर आरोप आणि टीका केल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा करताना जरांगे हे आपल्या सभांमधून काय बोलणार याकडे maharashtra ाचे लक्ष लागला आहे.

Manoj Jarange Third stage  Maharashtra tour see Complete schedule Maratha Reservation तर ठरलं! 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार

 

मनोज जरांगे हे 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहे. एकूण 6 टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जरांगे हे thane  पालघर,nashik  त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *