• Sat. May 4th, 2024

हिवाळ्यात राज्यात पावसाचा यलो अलर्ट, कोणत्या भागात अवकाळीचा अंदाज

Byjantaadmin

Nov 9, 2023

मॉन्सूनने निरोप घेऊन महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ऑक्टोंबर हिटचा तडाखाही राज्याने अनुभवला. त्यानंतर आता दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. वातावरण बदलाचा फटका देशातील अनेक भागाला आता बसला आहे. यामुळेच हवामान विभागाने नोव्हेंबर महिन्यात पावसाचा यलो अलर्ट गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी जारी केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आयएमडीने व्यक्त केली होती. त्यानुसार राज्यात बुधवारीसुद्धा अनेक भागांत पाऊस झाला. आता गुरुवारी पाऊस होणार आहे. देशात कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीपमध्ये मध्यम पाऊस होणार आहे. तेलंगणा, अंदमान आणि निकोबार द्विप समूह, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

राज्यात कुठे दिला यलो अलर्ट

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *