• Thu. May 9th, 2024

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता भाजपात प्रवेश करणार ?

Byjantaadmin

Nov 9, 2023

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली. सध्या राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत तर एक गट विरोधी पक्षात आहे. पक्षात पडलेल्या दोन गटामुळे कार्यकर्तेही विभागले गेले आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. मात्र, अशातच आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहेकर्जतचे माजी आमदार सुरेश लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री devendra fadnavis यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात गुरुवारी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादीला ( sharad pawar gat गट) मोठा धक्का बसणार आहे.

माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह कर्जतचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी नगराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते देखील भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत. सुरेश लाड आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये घनिष्ठ मैत्री होती. मात्र, sunil tatkare यांच्यासोबत राजकीय मतभेद झाल्यामुळे सुरेश लाड हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाबरोबर होते. पण आता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुका पाहता सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, सुरेश लाड यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयामुळे रायगडमध्ये ncp ला मोठं खिंडार पडणार आहे. त्यामुळे याचा फटका आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *