• Thu. May 9th, 2024

शिंदे, फडणवीसांची मंत्र्यांबरोबर बंद दाराआड चर्चा; सरकारमधील समन्वयासाठी सूचना

Byjantaadmin

Nov 9, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत 11 मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये धनगर समाजाच्या विकासासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. तर मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या सरकारमधील मंत्र्यांबरोबर बंद दाराआड जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा केली.

यावेळी CM SHINDE आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना सरकारमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. “राज्याला पुरोगामी विचारांची परंपरा असून महायुतीमधील मतभेद बाहेर जात असतील तर ते चुकीचे आहे, त्यामुळे समन्वय ठेवण्याची सरकारची जबाबदारी आहे”, अशा सूचना करत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचे कान टोचले.बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर पाठवून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री FADANVIS यांनी केवळ सरकारमधील मंत्र्यांसोबत दुसरी बैठक घेत मंत्र्यांचे कान टोचले. “महायुतीत विसंवाद असल्याचे चित्र बाहेर जनमाणसांत जावू नये, यासाठी समन्वय ठेवा”, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.”राज्याची पुरोगामी परंपरा आहे. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होता कामा नये, याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. महायुतीच्या बैठकीनंतर देखील मतभेद बाहेर येत असतील तर ते चुकीचे आहे. दिवाळीमध्ये वातावरण बिघडू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत”, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *