• Mon. Apr 29th, 2024

विलास सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, पूणे येथे मानाचा राज्यपातळीवरील ऊत्कृष्ट तांत्रीक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार प्रदान

Byjantaadmin

Jan 11, 2024

विलास सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, पूणे येथे मानाचा राज्यपातळीवरील ऊत्कृष्ट तांत्रीक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार प्रदान

• विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारातील तीन साखर कारखान्याना राज्यस्तरावरील ४ पुरस्कार
• विलास कारखाना वाटचाल आधुनीक साखर उदयोगासाठी पथदर्शी
• विलास कारखाना तांत्रिक कार्यक्षमतेत सर्वोत्कृष्ट

*लातूर प्रतिनिधी:  सहकार आणि साखर उदयोगाची मागदर्शक संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु., पुणे यांच्याकडून विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी कारखान्यास गळीत हंगाम २०२२-२३ साठीचा ऊत्कृष्ट तांत्रीक कार्यक्षमता पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. गुरूवार दि. ११ जानेवारी २०२४ रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे येथे वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी दुपारी भव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास माजी केद्रिंय मंत्री शरद पवार,  सहकार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री हषवर्धन पाटील, माजी मंत्री, व्ही.एस.आय.चे संचालक दिलीपराव देशमुख, आबासाहेब पाटील यांच्यासह सहकार, साखर उदयोगासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. या प्रसंगी विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु., पुणे यांच्याकडून उत्तरपूर्व विभागातील उत्कृष्ठ तांत्रीक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदानकरण्यात आला. हा पुरस्कार कारखान्याच्या वतीने विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवाराचे मार्गदर्शक, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरूनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, रंजित पाटील, गोविंद डूरे, अमृत जाधव, भारत आदमाने, रामदास राऊत, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर यांच्यासह अधिकारी यांनी स्वीकारला.

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारातील  तीन साखर कारखान्याना राज्यस्तरावरील ४ पुरस्कार

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांनी जाहीर केलेल्या यावर्षीच्य पुरस्कारामध्ये यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारातील (मांजरा कारखाना, रेणा कारखाना व विलास कारखाना) या तीन साखर कारखान्याना राज्यस्तरावरील ४ पुरस्कार मिळाले आहेत. या कारखान्याचे लातूरच्या सर्वांगीण विकासात उल्लेखनीय योगदान आहे. सहकार आणि साखर उद्योगाच्या माध्यमातून  शेतक-यांना शाश्वत उत्पन्नाचा कायमस्वरूपी चांगला मार्ग उपलब्ध केला यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली आहे. सहकारी संस्था आणि साखर उदयोगाच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यासाठी केले कार्य, सभासदांशी बांधीलकी मानून केलेले कार्य, दैनदीन कामकाजातील नियोजन, आर्थीक शिस्त आणि सभासद, कामगारांसाठी राबवीलेले नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतूक मान्यवरांनी केले. यावेळी मिळालेल्या पुरस्कारा बददल कारखाना व्यवस्थापन, सर्व संचालक मंडळ आणि प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

विलास कारखाना वाटचाल आधुनीक साखर उदयोगासाठी पथदर्शी

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व  जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना उभारणी आणि यशस्वीवाटचाल सुरू आहे. कारखान्याने उभारणीपासून ऊसलागवड ते ऊसतोडणी, वाहतूक तसेच कारखाना अंतर्गत अदययावत तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यात आले आहे. पहील्या गळीत हंगामापासून केलेल्या कामगिरीसाठी कारखान्यास २५ वर्षात ३४ पारीतोषीके मिळाली आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखान्याने साखर उदयोगात आपली वेगळी ओळख निर्माण करून दबदबा निर्माण केला आहे. ही वाटचाल सहकार आणि आधुनीक साखर उदयोगासाठी पथदर्शी ठरली आहे.
विलास कारखाना तांत्रिक कार्यक्षमतेत सर्वोत्कृष्ट

विलास सहकारी साखर कारखान्याने उभारणी पासून तांत्रीकदृष्टीने कारखानाअदययावत ठेवला. गत गळीत हंगामात मिल मधील उसाचा तंतुमय निर्देशांक -84.23 %., रिडयूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन (RME) – 96.15., साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा वापर % उस-42%, साखर तयार करण्यासाठी  लागणाऱ्या वीजेचा वापर – 31%  किलोवॅट, उस गाळप क्षमतेच्या वापरा मध्ये
वाढ -12.17% या कामगीरीच्या आधारावर कारखान्याची तांत्रीक गुणवत्ता सर्वोत्कृष्ट ठरली आहे. या कामगीरीची इतर कारखान्याशी तुलना करता विलास
कारखाना सरस ठरला आहे. हा पुरस्कार विलास कारखान्यास मिळाला याबददल मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सर्वसभासद, ऊस उत्पादक शेतकी,  खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कामगार, ऊसतोडणी व ऊस वाहतुक ठेकेदार यांचे अभिनंदन केले आहे.

भैरवनाथ रधुनाथ सवासे यांना खोडवा हंगामातील सर्वाधिक ऊस उत्पादनासाठी प्रथम पारितोषिक प्रदान

विलास सहकारी साखर कारखान्याचे लातूर तालुक्यातील कासारजवळा गावातील सभासद व कारखान्याचे संचालक  भैरवनाथ रघुनाथ सवासे यांना खोडवा हंगामासाठी को. ८६०३२ वाणाचे हेक्टरी २१५ मे. टन ऊसाचे उत्पादन घेतल्या बददल वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट ने खोडवा हंगामातील सर्वाधिक हेक्टरी ऊस उत्पादनाचे प्रथम पारीतोषिक त्यांना प्रदान केले.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *