• Mon. Apr 29th, 2024

देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल, ‘अटल सेतू’चे आज उद्घाटन

Byjantaadmin

Jan 12, 2024

, मुंबई:‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’चे आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. पंतप्रधान यावेळी स्वत: सेतूवरून प्रवास करीत रायगड जिल्ह्यात व नवी मुंबई विमानतळ परिसरात पोहोचणार आहेत.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) १७ हजार कोटी रुपये खर्चून या जवळपास २२ किमी लांबीच्या सेतूची उभारणी केली आहे. त्यातील १६ किमीचा भाग समुद्रावर असून देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल ठरला आहे.
या सेतूसह अन्य काही प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपुजन करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे आज, शुक्रवारी दुपारी विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरून तिथून हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने नौदलाच्या कुलाब्यातील हवाईतळावर येतील. त्यानंतर रस्त्याने शिवडी येथे पोहोचून ‘अटल सेतू’चे उद्घाटन करतील. यानंतर त्यांचा ताफा सेतूवरून प्रवास करीत चिर्ले येथे उतरेल व पुढे बांधकामाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात ते पोहोचतील. जवळपास ३० ते ४० मिनिटांचा तेथे कार्यक्रम होईल. त्यानंतर पंतप्रधान हेलिकॉप्टरने विमानतळाकडे जाऊन पुढील प्रवासाला निघणार आहेत.

Atal Setu: इंजीनियरिंग का करिश्मा है देश का सबसे लंबा समुद्री पुल, देखें  शानदार Photos - Atal setu mumbai trans harbour link mthl india s longest  sea bridge photos pm modi inaugration

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *