• Mon. Apr 29th, 2024

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सव निलंगा येथे उत्साहात साजरा 

Byjantaadmin

Jan 12, 2024
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सव निलंगा येथे उत्साहात साजरा
निलंगा(प्रतिनिधी):-राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सव निमित्ताने मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,संभाजी सेना, छावा व सकल मराठा समाज यांच्या वतीने राजमाता जिजाऊ चौक तसेच जिजाऊ सृष्टी येथे जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित जिजाऊ भक्तांनी ‘जय जिजाऊ जय शिवराय’ – तुमचं आमचं नातं काय.. जय जिजाऊ जय शिवराय’ राष्ट्रमाता जिजाज माँसाहेबांचा विजय असो’या घोषणा देत परिसर दणाणून सोडला यावेळी उपस्थित बांधवांनी जिजाऊंच्या जिवन चरित्रावर आपली मते मांडून इतिहासाला उजाळा देण्याचे काम केले.
यावेळी जाधव एम एम, ईश्वर पाटील, विशाल जोळदापके पाटील,विनोद सोनवणे, सुधीर पाटील,प्रमोद कदम,इंजि मोहन घोरपडे, आर के नेलवाडे, प्रकाश सगरे,डी. एस. धुमाळ,राजकुमार सोळुंके, किशन मोरे,प्रदीप कदम,सचिन धुमाळ, सचिन नाईकवाडे,भगवान जाधव,डी. एन. बरमदे,उत्तमराव पांचाळ,विजयकुमार धुमाळ, राहुल बिराजदार,धीरज शिंदे,संतोष घाडगे,अमोल फट्टे, संजय मोघे, धनाजी चांदूरे, ऍड. अरुण पाटील, रंजित गाडीवान,दत्ता सातपुते,राहुल पाटणकर आदी समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *