• Wed. May 1st, 2024

महाराष्ट्र महाविद्यालयात करीअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Byjantaadmin

Jan 23, 2024

निलंगाः येथिल महाराष्ट्र महाविद्यालयातील करीअर मार्गदर्शन कक्ष, वाणिज्य विभाग तसेच करीअर रूट्स अॅकॅडमी, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय करीअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत करीअर रूट्स अॅकॅडमीचे संचालक श्री गजानन म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या करीअर संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये बॅंकिंग, इन्शुरन्स, स्टाफ सिलेक्शन व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी व त्यातील विविध संधींवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वाणिज्य विभागप्रमुख डॅा. सुर्यकांत वाकळे उपस्थित होते. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॅा. ज्ञानेश्वर चौधरी आणि करीअर मार्गदर्शन कक्ष सदस्य डॅा. गोविंद शिवशेट्टे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. शिल्पा कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गिरी शिवानी आणि राठोड दिव्या यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. वैभव सुर्यवंशी, प्रा. सपना मोरे, गणेश वाकळे इ. नी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्याशाखेचे सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *