• Wed. May 1st, 2024

मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्षपदी शाम भोसले तर उपाध्यक्षपदी सचिन पाटील यांची निवड

Byjantaadmin

Jan 23, 2024

मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्षपदी शाम भोसले तर उपाध्यक्षपदी सचिन पाटील यांची निवड

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली युवकांना संधी

लातूर

लातूर जिल्ह्यातील मांजरा साखर परिवारातील सदस्य असलेला बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन म्हणून शाम भोसले (मातोळा) तर व्हॉईस चेअरमन म्हणून सचिन पाटील (मंगरूळ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या सूचनेनुसार दोन्ही युवकांना संधी मिळाली असून निवडीची घोषणा मंगळवारी निवडणूक अधिकारी यांनी केली आहे तत्पूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहिर करण्यात आले आहे 

तत्पूर्वी पक्ष श्रेष्ठीकडून निरीक्षक म्हणून राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, सचिन दाताळ अँड प्रवीन पाटील यांनी सर्व संचालक यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर नियमानुसार जिल्हा उपनिबंधक निवडणूक अधिकारी श्री बदनाळे यांचे सहाय्यक श्री नबी यांच्याकडे अध्यक्ष पदासाठी शाम भोसले व उपाध्यक्ष पदासाठी सचिन पाटील यांचे दोन्ही पदासाठी एकेक अर्ज भरण्यात आले त्यामुळे बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे

यावेळी संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे नूतन संचालक अँड श्रीपतराव काकडे,संचालक गणपत बाजुळगे, अँड बाबासाहेब गायकवाड, शामराव साळुंखे, सुभाष जाधव, भरत माळी, गोविंद सोनटक्के, संतोष भोसले, अनिल पाटील,रमेश वळके,विलास काळे, सौ निवेदिता पाटील, सौ शुभांगी बिराजदार प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे उपस्थित होते

नूतन चेअरमन व्हॉईस चेअरमन यांचा कारखाना प्रशासनाच्या वतीने सत्कार

यावेळी मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले उपाध्यक्ष सचिन पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, प्रशासकीय अधिकारी सूर्यकांत सावंत ,मुख्य लेखापाल गोपाळ चव्हान, चिप इंजिनियर सुनिल पवार, चिप केमिस्ट अन्नासाहेब पवार, टाईम किपर भुराज बदने आदी उपस्थित होते

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते मारुती साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष शाम भोसले उपाध्यक्ष सचिन पाटील यांचा सत्कार* *मारुती मध्ये  माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दोन्हीं युवकांना संधी

लातूर दि. २३.

लातूर जिल्ह्यातील बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या नूतन चेअरमन पदी श्याम भोसले (मातोळा) व्हाईस चेअरमन सचिन पाटील (मंगरूळ) यांची बिनविरोध निवड  मंगळवारी कारखाना स्थळी करण्यात आली नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आशियाना बंगल्यावर माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले आशिर्वाद घेतले यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते नूतन चेअरमन शाम भोसले उपाध्यक्ष सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या  मांजरा साखर  परिवारातील साखर कारखाना असलेल्या बेलकुंड येथील मारूती महाराज साखर कारखान्याने अतिशय सुंदर नियोजन करत कारखान्याने भरारी घेत उसाला योग्य भाव देत माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख,आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात कारखान्याने अतिशय चांगला प्रकारे शेतकऱ्यांना योग्य भाव देत कारखान्याचे यशस्वी गाळप सुरू आहे

यावेळी  राज्य साखर महासंघाचे संचालक तथा निरीक्षक आबासाहेब पाटील,  निरीक्षक सचिन दाताळ,संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे नूतन संचालक अँड श्रीपतराव काकडे, संचालक गणपतराव बाजुळगे, अँड बाबासाहेब गायकवाड, शामराव साळुंखे, सुभाष जाधव, भरत माळी, गोविंद सोनटक्के, संतोष भोसले, अनिल पाटील,रमेश वळके,विलास यांच्यासह इंदिरा सूतगिरणीचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, अँड प्रवीण पाटील,संभाजी रेड्डी  आदी मान्यवर उपस्थित होते

मांजरा परिवारातील संस्थांच्या निवडणुका बिनविरोधाची परंपरा

राज्यांतील एकीकडे सहकारी संस्था डबघाईला आल्या असताना लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील साखर उद्योग असो की सहकारी बँक,पतसंस्था या कार्यक्षम सुरू आहेत त्यांचे नेतृत्व माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमितजी देशमुख आमदार धीरजजी देशमुख करीत आहेत कारखाना योग्य भाव देत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता देण्याचे काम या मांजरा साखर परिवाराने केले आहे हे वास्तव्य मान्यच करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *