• Thu. May 2nd, 2024

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची डॉ. शिवाजी काळगे यांच्या समवेत निलंगा येथील दादापीर दर्ग्यास भेट

Byjantaadmin

Apr 19, 2024

आपला माणूस आपला लोकप्रतिनिधी असावा आपल्या समस्या सोडवण्यासाठी डॉ. शिवाजी काळगे यांना दिल्लीत पाठवावे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची डॉ. शिवाजी काळगे यांच्या समवेत निलंगा येथील दादापीर दर्ग्यास भेट मजारे शहीदवर केली चादर अर्पण

लातुर प्रतिनिधी :  लोकसभा निवडणूक लातुर लोकसभा मतदार संघाची असली तरी उमेदवार निलंगा येथील आहेत आपला माणूस आपला लोकप्रतिनिधी असावा असे वाटत असेल जे आपल्या समस्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत राहतील. लातूरचा सर्वांगिण विकास हवा असेल तर डॉ. शिवाजी काळगे यांना दिल्लीत पाठवावे लागेल, यासाठी यानिवडणुकीत आपण मी शिवाजी काळगे म्हणून कामाला लागावे, असे म्हणत येणाऱ्या काळात आपले जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आमच्यासोबत डॉ. शिवाजी काळगे सुध्दा कटिबद्ध राहतील, अशा शब्दात राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांनी आवाहन केले. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी निलंगा दौऱ्यावर
असताना निलंगा येथील दादापीर दर्ग्यास भेट दिली.यावेळी मजारे शहीदचे दर्शन घेऊन चादर अर्पण केली. दरम्यान माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि सज्जाद ए दादापिर यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, आज आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेले आहोत. आज देशासमोर अनेक समस्या अनेक आव्हाने असून ही आव्हाने आणि समस्या आमचे आदरणीय वरिष्ठ नेते आणि महाविकास आघाडी सरकारच दुर करू शकते. या वेळी जरी निवडणूक लातु लोकसभा मतदार संघाची असली तरी उमेदवार निलंगा येथील आहेत आणि आपला माणूस आपला लोकप्रतिनिधी असावा असे वाटत असेल जे आपल्या समस्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत राहतील, लातूरचा सर्वांगिण विकास हवा असेल तर डॉ. शिवाजी काळगे यांना दिल्लीत पाठवावे लागेल, यासाठी यानिवडणुकीत आपण मी शिवाजी  काळगे म्हणून कामाला लागावे, असे म्हणत येणाऱ्या काळात आपले जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आमच्यासोबत डॉ. शिवाजी काळगे सुध्दा कटिबद्ध
राहतील, अशा शब्दात उपस्थित आश्वस्त करीत या निवडणुकीत अधिकाधिक मतदान करून घ्यावे व डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करावे असे आवाहन केले.

यावेळी बोलताना सज्जाद ए दादापिर म्हणाले की, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि बाभळगावचा देशमुख परिवार आमच्या हृदयात बसलेला
परिवार असून या परिवाराने प्रत्येक समाजाला सोबत घेऊन सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न कायम केले. आजदेखील ही परंपरा कायम आहे असे म्हणत
आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पुढे बोलताना त्यांनी लातुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना मताधिक्य देण्यात येईल असा शब्द दिला. यावेळी बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, सद्या होऊ घातलेल्या
लोकसभा निवडणुकीत एक उच्च शिक्षित चांगला उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीने आपल्याला दिले आहेत. मागील १० वर्षात या
सरकारने केवळ फसव्या घोषणा दिल्या एकही आश्वासन पूर्ण केले नाही आणि आता जात धर्माच्या नावावर आपली दिशाभुल करीत आहेत. यामुळे आतातरी नागरीकांनी
सावध भूमिका घ्यावी व या निवडणुकीच्या माध्यमातून आलेल्या संधीचे सोने करावे, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण देशात इंडिया आघाडी आणि राज्यात
महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी उभे राहावे व डॉ. शिवाजी काळगे याना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना डॉ शिवाजी काळगे म्हणाले की, सद्या लातुर लोकसभा निवडणूक रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीत मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे. आपण आपली खंबीर साथ मला द्यावी व या निवडणुकीत बहुमताने निवडून द्यावे अशी विनंती केली. यावेळी बोलताना अभय साळुंके म्हणाले की, जिल्हा नियोजन समिती मधील प्राप्त निधी मधून निलंगा येथील दादापीर दर्गा परिसराचा विकास काँग्रेस पक्ष्याच्या माध्यमातून केला गेला असून आज लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे असून आपण निवडून द्यावे अशी विनंती केली. यावेळी त्यांच्या समवेत अशोकराव पाटील निलंगेकर, आबासाहेब पाटील, अभय साळुंके, निरीक्षक संतोष देशमुख, अजित माने, डॉ अरविंद भतांबरे, अजित
नाईकवाडे, पंकज शेळके, दयानंद चोपणे, विजयकुमार पाटील यांच्यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *