• Fri. May 3rd, 2024

दिशा प्रतिष्ठानने विद्यार्थ्याना प्रवेशासाठी प्रवेश शुल्काची अडचण केली दूर!

Byjantaadmin

Nov 30, 2022

दिशा प्रतिष्ठानने विद्यार्थ्याना प्रवेशासाठी प्रवेश शुल्काची अडचण केली दूर!

लातुर;-हॅपी टू हेल्प हे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत असलेल्या दिशा प्रतिष्ठान लातूरने अडचणीत असल्याला विद्यार्थ्याना प्रवेशासाठी प्रवेश शुल्काची अडचण दूर केली नेहमीच अडचणीत असलेल्याना दिशाने मदतीचा हात दिला आहे
1.खोसे सागर – रु 20,000
2.अम्बुलकर प्राजक्ता – रु 10,000
3.सोमवंशी अमित – रु 20,000
4.लासुने ज्योती – रु 15,000
5.वाघ ओमप्रकाश – रु 20;000
6.पांढ़रे अनिकेत – रु 5,000
7.पठाण फरिदा – रु 9,000
8.नंदिनी कुलकर्णी – रु 10,000
9.तांबोळी आमरीन – रु 20,000

या आर्थिक दृष्ट्या अडचणीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याना प्रवेशासाठी प्रवेश शुल्काची अडचण जाणवत होती.. त्यांनी दिशा प्रतिष्ठानला संपर्क करून सहकार्य करण्याची विनंती केली. दिशा प्रतिष्ठानच्या वतीने संबंधीत विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती घेऊन प्रवेश शुल्कासाठी एकूण 1,30,000 रुपयांचे सहकार्य केले व प्रवेश प्रक्रीया पूर्ण करून घेतल्या.
यामधील काही विद्यार्थी दुसर्‍यांदा तर काही विद्यार्थी तिसर्‍या वेळेचे दिशा प्रतिष्ठानमार्फत सहकार्य मिळालेले लाभार्थी आहेत.
एकही विद्यार्थी शिक्षणापासून
वंचित राहूनये
या संस्थेच्या मूळ हेतूच्या सकारात्मक प्रयत्ना मधून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी दिशा प्रतिष्ठान सदैव प्रयत्नशील आहे याप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वपरिचित
डॉ.ज्योती सुळ मॅडम (सुळ हॉस्पिटल लातूर )श्री.दत्तात्रय पाटील (उद्योजक)श्री.शोएब काझी (उद्योजक)
श्री.परमेश्वर शिंदे सर (दै. पुण्यनगरी पत्रकार निलंगा)
श्री कुणाल वागज (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य करण्यात आले.दिशा प्रतिष्ठान
सर्व टीमचे या कार्या बदल कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *