• Sat. May 4th, 2024

राज्यात पुन्हा अधिकाऱ्यांच्या बदल्या:तुकाराम मुंढे यांची 17 वर्षांत 19 व्यांदा बदली, अवघ्या 2 महिन्यात आरोग्य विभागातून उचलबांगडी

Byjantaadmin

Nov 30, 2022

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दोनच महिन्यांत आरोग्य विभागाच्या सेवा संचालनालयाच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाली. १ ऑक्टोबरला मुंढे यांची डॉ. रामास्वामी एन. यांच्या जागी बदली झाली होती. आरोग्य विभागातील त्यांच्या छापासत्रामुळे डाॅक्टर व कर्मचारी वैतागले होते. दरम्यान, मुंढे यांना अद्याप कोणत्याही विभागात पोस्टिंग दिलेली नाही. २००५ च्या आयएएस बॅचच्या मुंढे यांची मागील १७ वर्षात तब्बल १९ वेळा बदली करण्यात आली आहे.

राज्य सरकारने मंगळवारी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. शिर्डी साईबाबा संस्थानाच्या सीईओ भाग्यश्री बानाईत यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळ येथे बदली झाली. भंडारा जि.प.चे सीईओ अधिकारी विनय मून यांची परभणी जि. प. सीईओ म्हणून बदली झाली. देगलूर उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांची नागपूर जि.प. सीईओपदी नियुक्ती झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *