• Thu. May 2nd, 2024

पहिल्या टप्प्यात बंपर मतदान; महाराष्ट्राने पुन्हा निराशा केली, झाले इतके टक्के मतदान

Byjantaadmin

Apr 19, 2024

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४च्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान झाले. देशातील २१ राज्यातील १०२ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. पश्चिम बंगाल ते त्रिपुरा, मेघालय तर उत्तर प्रदेश-बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह तामिळनाडू आणि उत्तराखंडमध्ये मतदान पार पडले.

bumber voting

पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये नोंदवण्यात आले. येथे ७७.५७ इतके मतदान झाले. त्यानंतर त्रिपुरामध्ये ७६.१० टक्के तर पुद्दुचेरीत ७२.८४ टक्के इतके मतदान झाले. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान झाले. येथील मतांची टक्केवारी ५४.८५ इतके आहे.

राज्य मतदानाची टक्केवारी
त्रिपुरा 76.10%
पश्चिम बंगाल 77.57%
मेघालय 69.91%
मध्य प्रदेश 63.25%
तामिळनाडू 62.08%
उत्तर प्रदेश 57.54%
बिहार 46.32%
उत्तराखंड 53.56%
जम्मू-कश्मीर 65.08%
राजस्थान 50.27%
छत्तीसगड 63.41%
आसाम 70.77%
पुडुचेरी 72.84%
अरुणाचल प्रदेश 64.07%
नगालँड 56.18%
मिजोरम 53.96%
सिक्किम 68.06%
मणिपूर 68.62%
अंदमान निकोबार 56.87%
लक्षद्वीप 59.02%
महाराष्ट्र 54.85%

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने त्याचा फायदा कोणाला मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जनतेची नाराजी व्यक्त होते असे मानले जाते. मतदार विद्यमान सरकारला बदलण्यासाठी मत करतात. मतदानाची टक्केवारी वाढली म्हणजे सरकार बदलण्याचा विचार मतदारांच्या मनात असल्याचे म्हटले जाते. अर्थात २०१४ आणि २०१९ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढली होती तरी केंद्राच एनडीए सरकार आले होते. २०१४ साली ६६.४ तर २०१९ मध्ये ६७.३ टक्के मतदान झाले होते. तर २००९च्या मध्ये ५८.२ टक्के मतदान झाले होते.

महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले

रामटेक: ५२.३८ टक्के
नागपूर: ४७.९१ टक्के
भंडारा- गोंदिया: ५६.८७ टक्के
गडचिरोली- चिमूर: ६४.९५ टक्के
चंद्रपूर: ५५.११ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *