• Sun. May 5th, 2024

सुशिलाताई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी घेतली भेट

Byjantaadmin

Apr 20, 2024

सुशिलाताई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी घेतली भेट
अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला

लातूर प्रतिनीधी : माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या पत्नी श्रीमती सुशिलाताई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची निलंगा येथे श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी अतिशय आपुलकीने सुशिलाताई यांची आस्तेवाईकपणे चौकशी केली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. निलंगेकर कुटूंबीया सोबतच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.


विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख लातूर लोकसभा निवडणूकीच्या निमीत्ताने निलंगा येथे महीला मेळावा कार्याक्रमास गेल्या होत्या. यावेळी त्यांनी निलंगा येथील महारा्ट्र प्रदेश्‍ काँग्रेसचे सरचीटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा परीवार आणि बाभळगाव येथील आदरणीय विलासराव देशमुख यांच्या परीवाराचे नेहमीच कौटुंबीक पातळीवर सलोख्याचे संबंध राहीले आहेत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूर जिल्हयाच्या विकासासोबत शेतकरी, कष्टकरी, जनतेच्या विकासासाठी अनेक सिंचन प्रकल्प उभारणीस निलंगा तालुक्यासाठी पुढाकार घेतला. वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सुशिलाताई यांच्या सोबत झालेल्या या भेटीमध्ये आणि चर्चेत दोघींनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. निलंगेकर परीवाराने त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. या प्रसंगी संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ. सविता काळगे, सौ. स्मिता खानापूरे, डॉ. सारिका देशमुख, सुनिता आरळीकर, संगिता मोळवणे आदी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *