• Fri. May 3rd, 2024

मोदी, शहांना वेगळे नियम आहेत का? उद्धव ठाकरेंनी थेट ऑडियो क्लिप ऐकवली, निवडणूक आयोगाला सवाल

Byjantaadmin

Apr 21, 2024

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मशाल या गीतामध्ये ‘जय भवानी’ या शब्दामुळे निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना नोटीस बजावली आहे. यावर उद्धव ठाकरेंनी थेट पत्रकार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या ऑडियो क्लिप ऐकवत निवडणूक आयोगाला सुनावलं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे उघडपणे धार्मिक प्रचार करतात, त्यांना निवडणूक आयोगाने सूट दिली आहे का? नियमांमध्ये काही बदल केले आहेत का असा सवालही त्यांनी यावेळी निवडणूक आयोगावा विचारला आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेना उबाठा पक्षाने आपलं प्रचार गीत मशाल लॉन्च केलं. या गाण्यामध्ये ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू हा तुझा धर्म’ हे शब्द असल्यामुळे निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना नोटीस बजावली. ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू हा तुझा धर्म’ हे शब्द काढा अशी नोटीस निवडणूक आयोगाने ठाकरेंना पाठवली.

यावरुन उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मोदी आणि शहा यांच्या प्रचारसभांमधील काही ऑडिओ क्लिप ऐकवल्या. ज्यामध्ये ते बजरंगबली आणि रामाच्या नावावर प्रचारसभेत बोलताना दिसत आहेत. आम्ही जय भवानी म्हटलं, तर धार्मिक प्रचार होतो आणि मोदी, शहा जय बजरंगबली म्हणतात, ते कसं चालतं?, असा सवाल यावरुन उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. निवडणूक आयोग ही मोदी सरकारच्या हातातली बाहुली असल्याचंही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेत ओडियो क्लिप ऐकवली

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ऑडियो क्लिप ऐकवली. यामध्ये नरेंद्र मोदी बजरंग बली की जय बोलून बटण दाबा असं म्हणताना दिसत आहेत. तर अमित शहा हे आमचं सरकार आल्यावर प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करु, असं सांगत आहेत. त्यामुळे मोदी, शहांनी धार्मिक प्रचार केला तर चालतो का, त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केला. तसेच, आधी मोदी, शहांवर कारवाई करा असंही ते म्हणाले.आम्ही निवडणूक आयोगाला म्हटलं होती की तुम्ही आधी उत्तर द्या, जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर तुम्ही नियम बदलले आहेत असं गृहित धरुन आम्हीही असा प्रचार केला तर तुम्हाला आमच्यावर कारवाई करता येणार नाही, अन्यथा जर नियम बदलला नसेल तर त्याच्यावर काय कारवाई केली ते आम्हाला सांगा, असंही ठाकरे म्हणाले. आम्ही जय भवानी म्हणणारच, या भूमिकेवर ठाम असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *