• Mon. May 6th, 2024

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचीउदया उदगीर येथे सभा

Byjantaadmin

Apr 26, 2024

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची
उदया उदगीर येथे सभा

लातुर प्रतिनिधी : दि. २५ एप्रिल २०२४
लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डाँ.
काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस
पक्षाच्या सरचिटणीस नेत्या प्रियंकाजी गांधी यांची शनीवार दि. २७ एप्रिल
रोजी दुपारी ३ वाजता उदगीर येथे सभा आयोजीत करण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांकाजी गांधी यांच्या
सभांना देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या अनुषंगाने लातूर लोकसभा
मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डाँ. काळगे शिवाजी
बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ लातूर लोकसभा मतदार संघातील महत्वाचे शहर
असलेल्या उदगीर येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेची
जय्यत तयारी सुरू असून संपूर्ण मतदार संघातून मोठया प्रमाणात लोक या
सभेला लोक उपस्थित राहतील राहणार आहेत.
लातूर लोकसभा मतदारसंघातील युवक, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उदयोजक,
युवक यासह सर्व समाज घटक तसेच सर्वसमान्य नागरीकांनी या सभेला उपस्थित
रहावे असे आवाहन, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नेते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *