• Mon. May 6th, 2024

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) निलंगा युवक तालुका अध्यक्ष पदी महेश चव्हाण तर युवक शहराध्यक्षपदी रोहन सुखाले यांची निवड

Byjantaadmin

Apr 26, 2024

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) निलंगा युवक तालुका अध्यक्ष पदी महेश चव्हाण तर युवक शहराध्यक्षपदी रोहन सुखाले यांची निवड

युवक तालुका कार्याध्यक्ष पदी शिंदे,पठाण तर युवक शहराध्यक्षपदी जाधव

निलंगा तालुका येथील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे संघटन मजबुत करणेसंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची विचारधारा प्रदेश अध्यक्ष जयंतजी पाटील साहेब , युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुबजी शेख यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे,जिल्हा कार्याध्यक्ष बापुसाहेब पाटील उजेडकर,रशीद शेख यांच्या शिफारशीने निलंगा तालुका युवक च्या अध्यक्ष पदी महेश चव्हाण , तालुका कार्याध्यक्ष पदी पंकज शिंदे मुस्सा पठाण तसेच निलंगा युवक शहराध्यक्षपदी रोहन सुकाले,शहर कार्याध्यक्षपदी ,प्रमोद जाधव यांना निवडीचे पत्र युवकाचे मराठवाडा अध्यक्ष चंदन पाटील नागराळकर,युवक जिल्हाध्यक्ष भरत सुर्यंवंशी,युवक प्रदेश सरचिटणीस निशांत वाघमारे,सुग्रीव सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष सुधीर मसलगे,अंगद जाधव यांनी दिले.

जिल्हा कार्यकारिणी निवड खालील प्रमाणे करण्यात आली असुन नावे पुढील प्रमाणे आहेत जिल्हा सरचिटणीस पदी संदिप मोरे,जिल्हा चिटणीस राजाभाऊ माने,जिल्हा संघटक/ सचिव सुरेश रोळे, जिल्हा सहसचिव / सहचिटणीस मोहन माने मदनसुरीकर, जिल्हा संघटक सचिव शिवा आंबेगावे ची ही यावेळी जिल्हा कार्यकारिणीवर निवड करण्यात आली.

 या निवडीबद्दल तालुकाध्यक्ष सुधीर मसलगे कार्याध्यक्ष प्रविण कवटकर, लक्ष्मण क्षिरसागर,शहराध्यक्ष ईफरोज शेख,शहर कार्याध्यक्ष अँड.गोपाळ इंगळे, बस्वराज शिवदर्शन पाटील,अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष इस्माईल लदाफ, महिला आघाडीचे महादेवीताई पाटील,किरण सोळुंके,माधव चव्हाण,विकास ढेरे, धोंडिराम वाघमारे,जहाँगीर पटेल, खुशाबा कांबळे, खय्युम पठाण, शिवाजी एकंडे,प्रल्हाद पाटील,यशवंत पवार, हिराचंद जैन,बालाजी जोडतल्ले ,गहिनीनाथ चव्हाण, वैभव शिवरे, शंकर बनसोडे,सोशल मिडिया चे अभय चौधरी, सुरज जाधव तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन करुन पक्ष वाढीसाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *