• Tue. May 7th, 2024

निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी केली निलंगा तालुक्यातील मतदान केंद्रांची पाहणी

Byjantaadmin

Apr 26, 2024

निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी केली निलंगा तालुक्यातील मतदान केंद्रांची पाहणी

·         उष्णतेची लाट, अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेवून उपायोजनांच्या सूचना

·         मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रभावी मतदार जागृती करावी

लातूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी आज निलंगा तालुक्यातील विविध मतदान केंद्रांची पाहणी केली. तसेच उष्णतेची संभाव्य लाट आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेवून सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या.निलंगाचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाकडे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांना मतदान केंद्रांवर किमान मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करावी. तसेच लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचनाही निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी दिल्या.निलंगा येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्षाचीही निवडणूक सामान्य निरीक्षक यांनी यावेळी पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *