• Tue. May 7th, 2024

डॉ. विठ्ठल लहाने यांनी  विद्यार्थी व पालकांना दिला यशाचा पासवर्ड

Byjantaadmin

Dec 1, 2022

निलंगा:-येथील प्राध्यापक डॉक्टर तरंगे सरांच्या श्री कोचिंग क्लासेस येथे विद्यार्थी व पालकांना डॉक्टर विठ्ठल लहाने यांचे  मार्गदर्शन तसेच अकरावी बारावी NEET JEE, सातवी ते दहावी फाउंडेशन बॅचेस चा एक्सपर्ट व भारतातील नामांकित फॅकल्टी च्या साह्याने शुभारंभ करण्यात आले.

डॉ. विठ्ठल लहाने यांनी  विद्यार्थी व पालकांना यशाचा पासवर्ड या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कमिटमेंट कन्सिस्टन्सी कॉन्फिडन्स व कनेक्शन या आधारावर विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये या पासवर्डचा जर अमल केला तर ते भविष्यात यशस्वी होतील व उद्याचे आदर्श नागरिक तयार होतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांना तसेच पालकांना पण एकमेकांशी कसे राहिले पाहिजे कसे वागले पाहिजे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले
यावेळी निलंगा शहरातील विद्यार्थी व पालकांचा प्रचंड असा जनसमुदाय या कार्यक्रमासाठी उपस्थित होता कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यापारी महासंघाचे अध्यक्ष  प्रल्हाद बाहेती तसेच प्रचिती कॉम्प्युटरचे सर्वेसर्वा  उदय देशपांडे  श्री कोचिंग क्लासेस चे संचालक प्राध्यापक डॉ. गजेंद्र तरंगे सर व्यासपीठावर उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्राध्यापक सोमेश्वर स्वामी सर व आभार कु आभा तरंगे यांनी केले

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री कोचिंग क्लासेस च्या प्रत्येक सदस्याने खूप मेहनत घेतली म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *