• Tue. May 7th, 2024

शेतकऱ्यांची वीज सुरळीत करा अन्यथा एकाही  मंत्र्याला स्त्यावर फिरू देणार नाही-जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने

Byjantaadmin

Dec 1, 2022

शेतकऱ्यांची वीज सुरळीत करा अन्यथा एकाही  मंत्र्याला स्त्यावर फिरू देणार नाही….जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने

शेतकऱ्यांना लाईट व पिक विमा मिळण्यासाठी निलंगा शिवसेनेचा चक्काजाम

निलंगा/प्रतिनिधी
निलंगा तालुक्यावर अतिवृष्टी व मावा येलो मोजक सारख्या महाभयंकर रोगराईमुळे शेतकऱ्याचे नगदी समजले जाणाऱ्या सोयाबीनचे मोठे नुकसान झालेले असून सुद्धा शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात पीक विमा मिळत नसून त्यात जखमेवर मीठ चोळण्यासारखे वीज तोडणी मोहीम या सरकारने चालू ठेवल्याने ती तात्काळ थांबवा अन्यथा एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेल्या चक्काजाम आंदोलन प्रसंगी इशारा दिला.
महाराष्ट्रातील निष्क्रिय सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्याचे आणि रब्बी पिके भिजवण्या साठी शेतकरी अडचणीत असताना या शेतकरी विरोधी सरकारकडून शेतीची वीज तोडणी सुरू आहे ती तात्काळ थांबवावी व शेतीला सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा याबरोबर शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात खरीप पिक विमा मिळणे आवश्यक आहे परंतु रडक्याचे डोळे पुसल्याप्रमाणे मोजक्या लोकांना तुटपुंजा पिक विमा देण्यात येत आहे तरी नुकसानीच्या प्रमाणात पीक विमा देण्यात यावा या मागणीसाठी आज निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने जिल्हाप्रमुख विनोद आर्य उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील युवा सेनेचे जिल्हा समन्वयक दत्ता मोहोळकर शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील नाईकवाडे युवा सेना उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब मिरगाळे युवा सेना तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे उपशहर, निलंगा ता उप प्रमुख मुस्तफा शेख  प्रमुख संतोष मोघे माधव नाईकवाडे महिला आघाडी तालुका संघटिका रेखाताई पुजारी शहर संघटिका दैवता सगर मंगलबाई कांबळे महादेवी पाटील संगीता कदम पृथ्वीराज निंबाळकर शुभम खानापुरे अमोल सूर्यवंशी दीपक माने किशनराव मोरे शांताबाई लोहार विश्वनाथ लोहार लायक भाई शेख अनंत जाधव चक्रधर घोडके मारुती घोडके हुसेन ताहेरअली शेख विश्वामुळे विशाल पाटील पांढरे जोहरभाई सुधीर गोबाडे,रबानी सौदागर, महेबूब मिस्त्री,आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *