• Sat. May 4th, 2024

मारुती महाराज साखर कारखाना उस उत्पादक शेतकऱ्यांना मांजरा परिवारा बरोबर अधिक भाव देण्याचा प्रयत्न करू-माजी मंत्री दिलीपराव देशमुख

Byjantaadmin

Sep 28, 2022

मारुती महाराज साखर कारखाना उस उत्पादक शेतकऱ्यांना मांजरा परिवारा बरोबर अधिक भाव देण्याचा प्रयत्न करू

कारखान्याची गाळप क्षमता वाढवल्यास आधिक भाव देता येईल

माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख  यांचे प्रतिपादन

मारुती महाराज साखर कारखान्याची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

लातूर :-मांजरा साखर परिवारातील मांजरा, रेणा जागृति साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवली असून याच पद्धतीने मारुती महाराज साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवल्यास एप्रिल अखेर ऊसाचे गाळप होईल अधिक भाव मिळेल तसा प्रयत्न आम्हीं करणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख  यांनी येथे बोलताना दिली ते बुधवारी औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजीत करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख, हभप गणेश महाराज कानेगावकर माजी आमदार अँड त्रिंबक भिसे अँड श्रीपतराव काकडे, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, माजी आमदार दिनकर माने, ट्वेंटी वन शुगर चे उपाध्यक्ष विजय देशमुख, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव उपस्थित होते

लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या मुळेच कारखाना सुरू झाला

पुढें बोलताना दिलीपराव देशमुख  म्हनाले की या भागांतील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्याची भूमिका साहेबांची होती तीच भूमिका आमच्या परिवाराची आहे या भागात कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे जीवन मान बदलले दिसत आहे त्यामुळेच गाळप क्षमता वाढवल्यास अधिक भाव देता येईल तसा प्रयत्न करण्यात येत असून या भागांतील उस उत्पादक सभासदांना कुठल्याही परिस्थितीत खाली मान घालन्याची पाळी येणार नाही असे सांगून जे जे चांगल आहे ते आम्ही सभासदांसाठी करण्यासाठी कटिबद्ध आहोत ऊसाचे दर आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय असे सांगून जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने पिक कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय भारतात पहिल्यांदा घेतलाय हे सर्व तुमच्यासाठी केलेले असून भविष्यात जे जे चांगल आहे ते करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले

औसा विकासाच्या बाबतीत मागे का? पुढे आले पाहिजे

यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांनी लातूर विकासाच्या बाबतीत पुढें जात आहे त्यांच्या बरोबर आपण आले पाहिजे याचा विचार औसेकराणी केला पाहिजे भविष्यात आपल्याला सगळ्यांना सोबत घेवुन विकासाच्या मार्गावर घेवुन जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे असे ते म्हणाले..

शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी सर्व काही करु शेतकऱ्यां च्या चेहऱ्यावरील हास्य हेच समाधान

आमदार धीरज देशमुख यांनी दिला औसेकराना विश्वास

यावेळी बोलताना आमदार धीरज देशमुख यांनी मारुती महाराज साखर कारखाना सुरु झाल्याने शेतकऱ्यांचे जीवन मान बदलले असून पाण्याची पातळी वाढली आहे ऊसाचे क्षेत्र वाढले असून शेतकऱ्यांचे गाळप लवकर होण्यासाठी गाळप क्षमता वाढवणे गरजेचे असून शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी भविष्यात या साखर कारखान्याने गाळप क्षमता वाढवणे गरजेचे आहे असे सांगून कारखाना संचालक मंडळाचे कौतुक केले

सभेचे वाचन प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे यांनी केले यावेळी कारखान्यांचे चेअरमन. गणपतराव बाजुळगे , माजी आमदार दिनकर माने यांनी मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन सचिन पाटील यांनी मांडले

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सत्कारास औसा तालुक्यातील ग्रामस्थांची रीघ

यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख  यांना देशपातळीरील संगमनेर येथील स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात संस्थेचा सहकारातील नेतृत्व मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मारुती महाराज साखर कारखान्या च्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच चिंचोली, बेलकुंड, सिंदांळा, औसा, आलमला, नागरसोगा, अशिव, उजनी ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला

यावेळी कार्यक्रमास जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष एडवोकेट प्रमोद जाधव संचालक पृथ्वीराज शिरसाठ अनुप शेळके जिल्हा परिषद सदस्य नारायणराव लोखंडे माजी सभापती योगीराज पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह देशमुख बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले उपसभापती किशोर जाधव मीडिया प्रमुख हरिराम कुलकर्णी बँकेच्या संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील, बेलकुंडचे सरपंच कोळी महाराज, साळुंखे, मारुती महाराज साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक सी एन उगीले, रेणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बीवी मोरे जागृती शुगरचे सरव्यवस्थापक येवले, रेणा साखर कारखान्याचे संचालक प्रवीण पाटील, तसेच मारुती महाराज साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *