• Sun. May 5th, 2024

1 ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त शहरी व ग्रामीण भागामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन

Byjantaadmin

Sep 29, 2022

1 ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त शहरी व ग्रामीण भागामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन

लातूर(जिमाका):- जेष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा. समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक, मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळाच्या त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने राज्याचे सर्वसमावेशक धोरण, 2013 जाहिर केलेले आहे. तसेच दरवर्षी दि. 1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो.
1 ऑक्टोबर 2022 रोजी आंतराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त लातूर जिल्ह्यामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी जेष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे बाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार ग्रामपातळीवर जेष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीरे, गावातील रुग्णालयामध्ये जेष्ठांचे आरोग्य तपासणे, गावामध्ये विरंगुळा केंद्र स्थापन करून त्याचे उद्घाटन करणे, आनंद मेळावा आयोजित करणे बाबत मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांनी आपल्या स्तरावरून संबंधित यंत्रणेमार्फत आयोजित करावेत.
तसेच लातूर शहरामध्ये जेष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित करणे बाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार ग्रामपातळीवर जेष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीरे, गावातील रुग्णालयामध्ये जेष्ठांचे आरोग्य तपासणे,गावामध्ये विरंगुळा केंद्र स्थापन करून त्याचे उद्द्घाटन करणे, आनंद मेळावा आयोजित करणे, पोलीस विभागाकडून जेष्ठांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणे बाबत आयुक्त, लातूर महानगरपालिका, लातूर यांनी आपल्या स्तरावरून संबंधित यंत्रणेमार्फत आयोजित करावे. तसेच नगर परिषद/नगर पंचायत पातळीवर मुख्याधिकारी यांनी वरील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करावे.
जिल्हा शल्य चिकीत्सक, लातूर यांनी शहरी भागातील आरोग्य तपासणी शिबीराचे समन्वयक अधिकारी म्हणून कामकाज पहावे व सर्व ठिकाणी यशस्वीरित्या शिबीरे पार पाडणे बाबत प्रयत्न करावे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ग्रामपातळीवरील आरोग्य तपासणी शिबीराचे समन्वयक अधिकारी म्हणून कामकाज पहावे व सर्व ठिकाणी यशस्वीरित्या शिबीरे पार पाडणे बाबत प्रयत्न करावे.
वरील प्रमाणे संबंधीत विभागांनी 1 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावे असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *