• Sat. May 4th, 2024

जागतिक ह्रदयदिनानिमीत्त विशाल रॅली 

Byjantaadmin

Sep 29, 2022
जागतिक ह्रदयदिनानिमीत्त विशाल रॅली
रोटरी, रोट्रॅक्ट आणि शिवपुजे हार्ट केअर यांचा संयुक्त उपक्रम
   लातूर/प्रतिनिधी:दि.२९ सप्टेंबर हा दिवस जगभर जागतिक ह्रदयदिन म्हणून साजरा केला जातो.या निमित्ताने लातूर येथे रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन,रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊन,इंडियन मेडीकल असोसियेशन,लातूर आणि शिवपुजे हार्ट केअर यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले.ही रॅली क्रीडा संकुलापासून सुरु होऊन नंदी स्टॉप -आदर्श कॉलनी – राजीव गांधी चौक मार्गे पुन्हा क्रीडा संकुल या मार्गे काढण्यात आली.
   रॅलीचा समारोप क्रीडा संकुल येथे करण्यात आला.या कार्यक्रमास विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख,इंडियन मेडिकल असोसियेशन महाराष्ट्रचे उपाध्यक्ष डॉ.रमेश भराटे,रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे माजी प्रांतपाल डॉ.हरिप्रसाद सोमाणी व डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे, इंडियन मेडिकल असोसिएशन लातूरचे सचिव डॉ.भिसे,रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष वीरेंद्र फुंडीपल्ले,रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या अध्यक्षा अंकिता बिरनाळे, चन्नबसवेश्वर फ़ार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश भुसनुरे हे उपस्थित होते.
   उपस्थितांना शिवपुजे हर्ट केअरचे डॉ.संजय शिवपुजे यांनी ह्रदयरोगाची कारणे आणि ह्रदयरोग होऊ नये यासाठी घेण्याची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले.डॉ.हरिप्रसाद सोमाणी यांनी ह्रदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मैत्री व आरोग्यदायी पर्यावरणाच्या आवश्यकतेविषयी मार्गदर्शन केले.डॉ.सुधीर देशमुख यांनी उपस्थितांना आरोग्याविषयी कानमंत्र दिला.
  याप्रसंगी प्रा.विशाल आयाचित, डॉ.राजाराम दावनकर,सौ.उमा व्यास,वैष्णवी कुलकर्णी आणि डॉ श्रीनिवास भंडे यांनी पथनाट्याद्वारे उपस्थितांना जनजागृतीपर संदेश दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिनेश सोनी तर आभारप्रदर्शन वीरेंद्र फुंडीपल्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी व रोट्रॅक्ट लातूर मिडटाऊनचे सदस्य,शिवपुजे हार्ट केअरचे कर्मचारी व चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *