• Sun. May 5th, 2024

‘वेड’ च्या रिलीजसाठी रितेश, जिनिलिया आज लातुरात

Byjantaadmin

Dec 30, 2022

‘वेड’ च्या रिलीजसाठी रितेश, जिनिलिया आज लातुरात

लातूर : मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली बनलेल्या ‘वेड’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपली खास शैली सिनेरसिकांसमोर घेऊन येणारे लातूरचे सुपुत्र सुप्रसिद्ध सिनेअभिनेते रितेश विलासराव देशमुख व सुरेख अभिनय करणारी अभिनेत्री अशी ओळख असणारी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री जिनिलिया रितेश देशमुख शुक्रवार, दि. ३० डिसेंबर रोजी ‘वेड’ चित्रपटाच्या रिलीजसाठी लातूर शहरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दुपारी ४.३० वाजता पीव्हीआरमध्ये खास शो आयोजित करण्यात आला आहे.

दुपारी ४.३० वाजता पीव्हीआरमध्ये होणार कार्यक्रम

राज्यातील सर्वच सिनेमागृहात रिलीज होणार आहे. इतर राज्यात ज्या-ज्या ठिकाणी मराठी भाषिक चित्रपट रसिक आहेत, त्या ठिकाणीही ‘वेड’ इंग्लिश सबटायटलमध्ये रिलीज होणार आहे. ‘वेड’च्या रिलीजसाठी रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख आज लातूरला येत आहेत. रितेश-जिनिलिया आज दुपारी १२ वाजता तुळजापूरला जाणार आहेत. तेथे आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन दुपारी ४.३० वाजता लातूर शहरातील पीव्हीआर सिनेमागृहात ‘वेड’ च्या रिलीजसाठी येणार आहेत. मनमोहक टिझर, उत्कंठावर्धक ट्रेलर आणि कर्णमधूर गीत-संगीतामुळे ‘वेड’ ची मरठी सिनेरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘वेड’ मध्ये मुख्य भूमिकेत असणारे रितेश- जिनिलिया मराठी सिनेरसिकांना वेड लावणार आहेत. रितेश यांचे दिग्दर्शनात आणि जिनिलिया यांचे मराठी सिनेमात पदार्पण असा दुग्धशर्करा योग ‘वेड’ च्या निमित्ताने जुळून आला आहे. या चित्रपटाची पटकथा ऋषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली तर संवाद लेखन प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *