• Fri. May 3rd, 2024

Hindenburg आणखी किती नुकसान करणार; गौतम अदानींना किंमत मोजावी लागतेय

Byjantaadmin

Jan 31, 2023

नवी दिल्ली: अब्जाधिश गौतम अदानी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. गेल्या आठवड्यात अमेरिकन रिसर्च कंपनी, हिंडेनबर्गने अदानी समूहावर एक अहवाल प्रकाशित केला, ज्याची किंमती अजूनही अदानी मोजत आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजरात गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले. यानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सची घसरगुंडी सुरु झाली. हिंडेनबर्गच्या एका अहवालाने गौतम अदानी यांच्या साम्राज्याला सुरुंग लावला. याशिवाय शेअर्समध्ये होणारी घाणीचा परिणाम अदानींच्या संपत्तीवरही दिसून आला.

साल २०२३ मध्ये गौतम अदानी जगातील सर्वात मोठा श्रीमंत व्यक्ती बनण्याचे अपेक्षित होते, पण आता हिंडेनबर्गच्या अहवालानंतर त्यांच्यावर जगातील पहिल्या १० श्रीमंतांच्या यादीततून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अशी घसरण झाली की अवघ्या सात दिवसात अदानींच नशीब बदललं. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या क्रमांकावरून आता थेट ११व्या क्रमांकावर घसरले आहेत. फक्त महिन्याभरात अदानींनी $३६.१ अब्ज डॉलरचे नुकसान झाले सौं त्यांची एकूण मालमत्ता $८४.४ अब्ज डॉलर इतकी राहिली आहे. याशिवाय प्रतिष्ठित उद्योगपती मुकेश अंबानी अदानींच्या मागे १२व्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे एकूण $९२.२ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

उल्लेखनीय आहे की गेल्या वर्षी जगातील पहिल्या १० श्रीमंतांपैकी फक्त अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीत वाढ नोंदवण्यात आली होती. अदानी गेल्या वर्षी सर्वाधिक कमाईच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होते. याशिवाय या वर्षी मुकेश अंबानी ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या टॉप-१० अब्जाधीशांमधून १२व्या स्थानावर घातले आहेत.

कमाईसोबत गमावण्यातही नंबर १
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी या वर्षी संपत्तीच्या नुकसानीच्या बाबतीत जगातील अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले असून आतापर्यंत $३६.१ अब्ज डॉलर गमावले आहेत. त्यांच्यानंतर रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींना आतापर्यंत ४.९६ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असून तिसऱ्या क्रमांकावर D’Mart चे सर्वेसर्वा राधाकृष्ण दमाणी यांनी २.१ अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *