• Sun. May 5th, 2024

आयुर्वेद सिद्धांताचे पालन करून भावी डॉक्टरांनी समाजाची सेवा करावी-माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे आवाहन

Byjantaadmin

Feb 1, 2023

आयुर्वेद सिद्धांताचे पालन करून भावी डॉक्टरांनी समाजाची सेवा करावी-माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे आवाहन

बी .व्हि. काळे आयुर्वेदिक महाविध्यालयातील ४६ विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ संपन्न

 

लातूर :-निसर्ग आणि आयुर्वेद यांची सांगड घातल्यास उत्तम आरोग्य उत्तम ठेवून ताण तणाव कमी करून भावी डॉक्टरांनी समाजाची सेवा करावी यासाठी मांजरा चॅरीटेबल ट्रस्ट सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल असे आवाहन राज्याचे माजी मंत्री मांजरा चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष दिलीपराव देशमुख  यांनी केले
ते लातूर येथील मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित बी. व्ही काळे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील 2016-2017 या बॅच चा दीक्षांत सोहळा दिनांक 29 जानेवारी रविवार रोजी थोरमोटे लॉन्स ओसा रोड लातूर येथे आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

पुढें बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की ग्रामीण भागातील लोकांना सेवा द्यावी स्वतः च्या प्रकृतीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे गरीब लोकांची सेवा करा यातून खूप समाधान मिळते असे सांगून भावी सर्व डॉक्टर विद्यार्थ्याना मनापासून शुभेच्छा दिल्या त्यांचे कौतुक केले

तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मांजरा ट्रस्ट चे अध्यक्ष सन्माननीय दिलीपराव देशमुख यांच्या शुभ हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ श्री अजय देवरे जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. लक्ष्मण देशमुख बी व्हि काळे आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य तथा प्रशासकीय अधिकारी डॉ पवार आनंद ,डॉ संगीता देशमुख बी.ओ. एस. सदस्य नाशिक आरोग्य विद्यापीठ हे उपस्थित होते या दीक्षांत समारंभात 46 विद्यार्थ्याना पदवी प्रदान करण्यात आली

यावेळी प्रमुख अतिथी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ श्री अजय जी देवरे यांनी डॉक्टर होत असताना महाविद्यालयीन अनुभव सांगुन बरेच मित्र विविध क्षेत्रात कार्यरत असून, आयुर्वेद प्रॅक्टिस प्रामुख्याने करावी व स्पर्धा परीक्षा देवून विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत ही कार्य करावे असे मनोगतात व्यक्त केले. यावेळी डॉ लक्ष्मण देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आयुर्वेद डॉक्टर यांनी कोविड काळात उत्तम कार्य केले तसेच सध्या ग्रामीण भागात सी एच ओ या पदावर आयुर्वेद डॉक्टर अविरत काम करत आहेत हे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ आनंद पवार यांनी आदरणीय श्री दिलीपराव देशमुख  यांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने चालणाऱ्या महाविद्यालय येथील बरेच डॉक्टर हे प्रॅक्टिस करत आहेत तसेच प्रशासकीय सेवेत आहेत.आतापर्यंत 900 विद्यार्थी महाविद्यालय येथून डॉक्टर झाले आहेत त्यातील 150 पेक्षा जास्त हे उच्चशिक्षित तज्ञ झाले आहेत, राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत याचा उल्लेख केला
या कार्यक्रमास राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते . याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, सर्व शिक्षक, डॉ निरगुडे डॉ मुळजे डॉ महिंद्रकर, डॉ नरहरे ,डॉ मलवाडे डॉ मुळे, डॉ पवार डॉ नाईकवाडी. आर एम ओ डॉ चव्हाण श्री कदम श्री जैन श्री तट तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम नियोजनासाठी डॉ जयदीप, डॉ निलेश, डॉ श्रीकांत, डॉ अखात महविद्यालय व रुग्णालयातील त्यांचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यार्थी डॉ.संकेत घुले डॉ दिशा गुडूप यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ सुप्रिया मोरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *