• Sun. May 5th, 2024

खा.सुधाकर श्रृंगारेंच्या उपस्थितीत वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

Byjantaadmin

Feb 1, 2023

खा.सुधाकर श्रृंगारेंच्या उपस्थितीत वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

लातूर ः लातूर जिल्हा मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन विद्यार्थी मेळावा व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा रविवार दि.29  जानेवारी 2023 रोजी पार पडला. हा कार्यक्रम सोहळा मिलींद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर श्रृंगारे व प्रमुख पाहुणे म्हणून अजीत कव्हेकर, माजी नगरसेवक रवी सुडे, हाशमी एम.एस., राजकुमार गोजमगुंडे, अ‍ॅड.विजयकुमार अवतारे, लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रविकिरण सुर्यवंशी, संजय राजुळे यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात आदर्श शिक्षक पुरस्कार व वरिष्ठ तंत्रज्ञ पुरस्कर वितरण सोहळा पार पडला.
यावेळी पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या दयानंद शिरसाठे, भांबरे पोपट, बशीर शेख, गौतम गायकवाड, ज्योतीबा पवळे, विवेकानंद स्वामी, मौला शेख, प्रियंका ओकले, बळवंत चिंचोळकर, सचिन पुरी, सिध्दू शेटकार, अनिल बिराजदार, ए.एन.शेख यांना पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ.हिराप्रकाश मिलींद कांबळे, हारूण शेख, गणेश देशमुख, विरेंद्र धानोरकर, धिरेंद्र कलमे, सतीश घनगावे, महेश निटूरे, सय्यद रशीद, गोपाळ गव्हाणे, नागेश कोल्हे, विक्की हनमंते, निखील चिडगीर, बालाजी पाटील, शिंदे अनिकेत, शंकर चव्हाण, ऋषिकेश शिंदे, रोहन गायकवाड, सुजीत जाधव, सचिन राठोड, सागर वाघमारे, ऋषीकेश चव्हाण, अरूंधती वाघमारे, सानिया शेख, करण कदम, रूपेश अजगरे, शोएब शेख, अनिकेत माटे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम सोहळा पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *