• Sun. May 5th, 2024

लातूर जिल्हा बँक उस तोडणी यंत्रासाठी कर्ज पुरवठा करणार-जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांची माहिती

Byjantaadmin

Feb 1, 2023

लातूर जिल्हा बँक उस तोडणी यंत्रासाठी कर्ज पुरवठा करणार-जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांची माहिती

लातूर :-शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक विकास करणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना उस तोडणी यंत्रासाठी मागील वर्षी कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीही शेतकऱ्यांना उस तोडणी यंत्रासाठी कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी दिली आहे

राज्यात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी हा केंद्र बिंदू समोर ठेवून वेगवेगळ्या योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने पिक कर्ज वाटप करण्याचा निर्णय देशात लातूर जिल्हा बँकेने पहिल्यांदा घेतला आहे हे करित असताना बँक नफ्यात ठेवून शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच बँकेच्या ठेवीदारांना सुधा १ फेब्रुवारी २०२३ पासून ०.५० ते २% पर्यंत व्याज दरात वाढ केली करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबरोबरच दुसरीकडे ठेवीदार ग्राहकांना सुधा व्याजात वाढ केली आहे

*उस यंत्राला मोठा प्रतिसाद लाभार्थ्यांची नियमित परतफेड*

जिल्हा बँकेने तीन वर्षापूर्वी या योजनेला प्रारंभ केला होता मागच्या वर्षी तब्बल १०५ कोटी रुपये उस यंत्रासाठी कर्ज वाटप केले होते त्या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे तसेच नियमित कर्जदारांची परतफेड सुद्धा बँकेकडे झालेली आहे यातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे तसेच शेतकरी सभासदांची मागणी लक्षात घेऊन संचालक मंडळाने यावर्षीही उस यंत्राला कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या शिफारशींने कर्ज वसुलीच्या हमीवर कृषि यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ही योजना असुन शेतकरी सभासदानी
या उस तोडणी यंत्र कर्जाचा लाभ घेण्यासाठी आपल्या साखर कारखान्यामार्फत उस तोडणी यंत्र कर्ज प्रस्ताव जिल्हा बँकेच्या कार्यालयात सादर करावा असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख, व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव, सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *