• Fri. May 3rd, 2024

आज जागतीक आर्किटेक्ट दिवस

Byjantaadmin

Oct 3, 2022

आज जागतीक आर्किटेक्ट दिवस

आज जागतीक आर्किटेक्ट दिवस ! हा दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी साजरा करण्यात येतो.

आर्किटेक्चर म्हणजे वास्तुकला ही सर्व कलांची जननी मानली जाते. कारण मानवाच्या मूलभूत गरजांपैकी ही एक अशी कला असून त्यात प्रगती होत गेली. बंगले, अपार्टमेंट्स, दुकाने, ऑफिसेस, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, मंदिरे, बँका, इंडस्ट्रीज, कॉलनीज, बागा, वसतिगृहे, मॉल, मल्टिप्लेक्स, क्रीडा संकुल, विमानतळ, शोरूम्स या मानव निर्मित स्थळा मध्ये या वास्तुकलेने मोठे चैतन्य भरले आहे. या वास्तुकले मध्ये वास्तू सौंदर्य, हवा आणि प्रकाशाचा सुरेख संगम, अभिरुची, उपलब्ध साधन सामग्रीचा सुयोग्य वापर, मजबुती व टिकाऊपणा, सुसंबद्धता, पर्यावरणपूरकता, दळणवळण इत्यादी पैलूंचा अभ्यास करून मूर्त स्वरूप दिले जाते.

वास्तुकला ही कला आणि विज्ञान यांच्या संगमाने बहरत जाते. वास्तूंमध्ये कलात्मक चैतन्य भरण्या बरोबरच मजबूत बांधकाम शैली, सुयोग्य तंत्रज्ञान, साधन सामग्री अशा तांत्रिक बाबतीत असलेले नियोजनही वास्तुरचनाकाराकडून केले जाते. अशा प्रकाराच्या वास्तू निर्मितीतून वास्तुरचनाकारास उच्च प्रकाराचे मानसिक समाधान मिळत असते. त्याच बरोबर वापरकर्त्यांची धन्यवादाची पावतीही मिळत असते.

फ्रँक लॉइड लाइट, वॉल्टर ग्रोपिअस, ला कार्बुझिए, मिज हँडर रोह, लुई कान्ह, लॉरी बेकर, चार्ल्स कोरिया यासह अनेक आर्किटेक्ट्स आपल्या प्रतिभा संपन्न वास्तू आाणि अवकाश निर्मितीमुळे अजरामर झाले आहेत.

दिवसें दिवस वाढती लोकसंख्या, वाढत्या गरजा, वास्तू तथा अवकाशनिर्मिती बाबतची समाजातील वाढती जागरुकता यामुळे प्रतिभावंत आर्किटेक्ट्सची समाजातील गरज वाढतच चालली आहे. पण भारताची एकूण लोकसंख्या पाहता वास्तुकला क्षेत्रात कळकळीने काम करणारांची संख्या अतिशय कमी आहे.

आर्किटेक्ट या क्षेत्रात करिअरच्या उत्तम अशा संधी आहेत. शिक्षणानंतर सुरुवातीच्या अनुभवानंतर वैयक्तिक अथवा भागीदाराबरोबर प्रॅक्टिस, चांगल्या फर्म मध्ये सेवा असे अनेक पर्याय आहेत. जगाच्या पाठीवर कोठेही शहर व खेड्यातही सेवेच्या संधी उपलब्ध आहेत.

आजच्या आर्किटेक्ट दिवसाच्या सर्व आर्किटेक्टना शुभेच्छा !

संकलन व संकल्पना
मौजन ए आर
साभार
नेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *