• Mon. May 6th, 2024

पुण्यात भाजपला एकापाठोपाठ धक्के, तीन नेत्यांवर गुन्हे दाखल

Byjantaadmin

Feb 27, 2023

पुणे: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले होते. मतदान होताच पुण्यातील भाजप नेत्यांना एकापाठोपाठ धक्के बसताना दिसत आहेत. कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत रासने हे रविवारी कसब्यातील मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गळ्यात कमळाचे चिन्ह असलेले उपरणे होते. हा आचारसंहितेचा भंग असल्याने हेमंत रासने यांच्या कृतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, आता हेमंत रासने यांच्यावर विश्रामबागवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्रात मतदान करताना भाजपच्या चिन्हाचे उपरणे घालून गेल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे हेमंत रासने यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यावर भाजपचे नेते आता काय प्रतिक्रिया देतात, हे बघावे लागेल.

तत्पूर्वी पुण्याच्या गंजपेठेत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कसब्यात मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी भाजपच्या गणेश बीडकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही तासांमध्ये भाजपच्या तीन नेत्यांवर एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल झाले आहेत. आता पोलीस आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणांमध्ये पुढे काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल.

नेमकं काय घडलं होतं?

कसबा पोटनिवडणुकीचं मतदान करताना हेमंत रासने हे गळ्यात भाजपचं चिन्ह असलेले उपरणं परिधान करुन आले होते. या उपरण्यावर कमळाचे चिन्ह होते. परंतु, रासने मतदान करत असताना केंद्रावरील एकाही अधिकाऱ्याने त्यांना हटकले नव्हते. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी हेमंत रासने यांच्या कृतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. रुपाली पाटील ठोंबरे यांनी आता निवडणूक आयोगाकडे हेमंत रासनेवर कारवाई करण्याची मागणी केली होते.

 

तुम्ही सरकार स्थापन केलेलं नाही, तर राजकीय व्हीआरएस घेतलाय; आदित्य ठाकरेंनी ४० बंडखोरांना डिवचलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *