• Mon. May 6th, 2024

औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी साखरेने शिंदे-फडणवीसांचे तोंड केले गोड…

Byjantaadmin

Feb 27, 2023

ausa उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले आणि पुढे त्यांच्याच आदेशाने राजकीय आखाड्यात उतरलेले औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी पुन्हा `करुन दाखवले` असेच म्हणावे लागेल. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला किल्लारीचा साखर कारखाना अभिमन्यू पवार यांनी अवघ्या १११ दिवसांत सुरू केला. एवढेच नाही तर याच कारखान्यातील साखर घेऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंड गोड केले.

आपल्या कामाच्या धडाक्यामुळेच पवार हे फडणवीसांचे विश्वासू बनल्याचे बोलले जाते. आपल्या शिष्याच्या कामाचा हा धडाका पाहून फडणवीसांना निश्चितच त्यांना अभिमान वाटला असले MLA ABHIMANYU PAWAR काम करण्याची पद्धत वेगळी आहे. एखादे इच्छित साध्य करायचे असेल तर ते वरिष्ठांकडे थेट न मागता आधी अपार कष्ट घेतात आणि मग ते कामा घेऊन पक्षश्रेष्ठीकडे जातात.त्यामुळे त्यांची नेत्यांशी जवळीक किती यापेक्षा त्यांनी केलेले काम वरिष्ठांच्या नजरेत कसे भरेल असा त्यांचा प्रयत्न असतो.

एकदा काम आवडले की आपोआप पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात. अभिमन्यू पवार यांना याचा अनुभव आतापर्यंतच्या राजकारणात वेळोवेळी आलेला आहे.औसा मतदारसंघात इन्ट्री घेण्यापूर्वी त्यांनी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविली. ही निवडणूक ते जिंकू शकणार नाहीत याची कल्पना असतानाही त्यांनी मारलेली जोरदार मुसंडी विधानसभेच्या निवडणुकीची पायाभरणी ठरी होती.

आताही त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला किल्लारी साखर कारखाना केवळ १११ दिवसात सुरू केला आणि त्याची साखर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातावर ठेवत आपली कामगिरी त्यांच्या नजरेत उतरवली. ज्या प्रमाणे मारुती कारखान्याने पवारांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा केला होता, त्याचप्रमाणे किल्लारी कारखाना त्यांच्या मंत्रिपदाचा मार्ग मोकळा करणार का? हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे. एकीकडे किल्लारी परिसरातील लोकांनी किल्लारीला तालुक्याचा दर्जा देणे नैसर्गिक आणि भौगोलिक दृष्टीने कसे योग्य आहे, हे पटवून देत आमदार पवारांकडे तगादा लावला आहे. कारखाना सुरू करण्याचा दिलेला शब्द आणि किल्लारीकरांची तालुका व्हावा ही तीव्र इच्छा या दोहोंमध्ये अडकलेल्या पवारांनी आपले लक्ष कारखाना सुरू करण्यावर के केंद्रित केले होते.

९५ कोटी कर्ज आणि एक ना एक इंच जागा गहाण असतांना कोणतीही बँक कर्ज देत नसल्याने पवारांनी त्यांच्या मित्रांकडून स्वतःच्या हमीवर भागभांडवल गोळा केले आणि कारखाना सुरू केला. या करखान्यातून तया झालेली साखर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या चहापान वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हातात ठेवली. हा कारखाना फायद्यात आणण्यासाठी बायप्रोडक्ट निर्मितीचा संकल्प बोलून दाखवला. त्यांना शासनाकडून सर्वोत्तपरी मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.

राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *