• Thu. May 9th, 2024

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर दोन्ही सभागृहात गोंधळ:दिवसभरासाठी कामकाज तहकूब; वक्तव्याची चौकशी होणार, विधानसभा अध्यक्षांची घोषणा

Byjantaadmin

Mar 1, 2023

वाढती महागाई, वीजप्रश्नांनवर विरोधक आक्रमक झालेत. त्यांनी आज विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या मुद्द्यावर जोरदार आंदोलन केले. हे प्रश्न सोडवा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. विधिमंडळ अधिवेशनातील प्रत्येक घडामोड जाणून घेऊयात…

– संजय राऊत यांच्या चोरमंडळ या वक्तव्याचे विधानसभेत जोरदार प्रतिसाद उमटले. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी हक्कभंग आणण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. यानंतर खासदार संजय राऊत यांना अटक करा अशी मागणी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली आहे.

वाचा महत्त्वाचे मुद्दे

  • संजय राऊत यांना अटक करा; प्रवीण दरेकरांची विधानपरिषदेत मागणी
  • निषेध केला नाही तर हजारो राऊत विधीमंडळाचा अपमान करतील; आम्ही चोर असलो तर उद्धव ठाकरेंही याच विधीमंडळाचे सदस्य आहेत. ते ही चोर ठरतील असे वक्तव्य विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
  • आम्ही राऊतांच्या वक्तव्याच्या समर्थन केले नाही, राऊतांच्या विधानाची तपासणी करुन कारवाई करावी असे मत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे.
  • विरोधकांना देशद्रोही म्हणणेही चुकीचे आहे, असे मत अनिल परब यांनी व्यक्त केले.
  • राऊतांचे वक्तव्य हे महाराष्ट्राचा अपमान; विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीची घोषणा
  • 2 दिवसात कारवाई करू 8 तारखेला हक्कभंगावर निर्णय देणार आहे, राहुल नार्वेकर यांची माहिती
  • राज्याचा अपमान करण्याचार अधिकार कुणालाच नाही, कारवाईला कुणाचा विरोध नव्हता, आमचे राऊतांना समर्थन नाही – नाना पटोले.
  • संजय राऊत यांनी केलेले वक्त्व्य हे असंसदीय आहे, त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला म्हणत राऊतांविरोधात सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केले आहे.

– संजय राऊत यांच्या चोरमंडळ शब्दाला शिवसेना-भाजपकडून जोरदार आक्षेप. विधिमंडळाचा अपमान झाल्याचा आरोप करत भाजप आणि शिवसेनेचे आमदार आक्रमक. कोणत्याही नेत्यांनी अशी वक्तव्ये करू नये, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आवाहन. चोरमंडळ म्हणण्याचा कोणालाही अधिकार नाही. वक्तव्य तपासून पाहावे, अशी अजित पवारांची मागण

संजय राऊत यांनी चोरमंडळ म्हणणे हा विधिमंडळाचा अपमान आहे. माझ्याकडे क्लीप आहे. ते हे गुंडमंडळ म्हणाले. या विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे. त्यांचे प्रकरण हक्कभंगाकडे पाठवावे, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली

महागाईच्या मुद्दयावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहेय. शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्याची मागणी करण्यात येत आहे. वीज द्या अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्याने आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यापालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार आहेत.

जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाची लेणी व बीबीका मकबऱ्याला भेट; ऐतिहासिक वारसा पाहून भारावून गेल्या विदेशी पाहुण्या

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *