• Thu. May 9th, 2024

शिंदे मुख्यमंत्री होताच भाजपच्या ८० ते ८५ लोकांमध्ये बंडाची तयारी पण..अजित पवारांचा गौप्यस्फोट

Byjantaadmin

Mar 1, 2023

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विविध विषयांवरुन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं. यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रश्न, राज्यातील सत्तासंघर्ष, पक्षांतर बंदी कायदा, घटनापीठातील सुनावणी, एसटीची दुरावस्था, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक या मुद्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं. महाराष्ट्रात जून २०२२ मध्ये राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाच्या काळातील एक प्रसंग सांगत अजित पवारांनी भाजपला कोंडीत पकडलं.

अजित पवार काय म्हणाले?

आठ महिन्यांपूर्वी हे सरकार सत्तेवर आलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला. त्यानंतर पहिला झटका बसला. भाजपच्या आमदारांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असं वाटत होतं. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माझ्याशी बोलताना हे काय होऊन बसलं असं म्हटल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. भाजपच्या काही जणांनी ८० ते ८५ लोकांनी बंड करायचं का असं म्हटलं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी असलं काही करु नका, त्या दोघांना कळलं तर सगळा सुपडा साफ होईल असं म्हटलं. वरुन आदेश आहे, असं म्हटल्यानं सगळे शांत बसल
सरकार सुरु झाल्यानंतर सुरुवातीला दोघेच मंत्री होते. पुढचे काही दिवस आम्ही खंबीर असल्याचं ते सांगत होते, असं अजित पवार म्हणाले. पुढील काही दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. आठ महिने झाले मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, असं अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्रात यांचं सरकार आल्यानंतर सहा महिन्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. पाच मतदारसंघापैकी चार जागा पराभूत झालेत. डॉ. रणजीत पाटील पहिल्या क्रमांकाच्या पसंतीक्रमानं निवडून येतील असं म्हटलं होतं, तेही पराभूत झाले, असं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांची मराठीबाबत उदासीन भूमिका दिसून आली त्यामुळं महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *