• Thu. May 9th, 2024

…अन् सत्ताधारी पक्षाने विषय दुसरीकडेच भरकटवला; रोहित पवारांचा निशाणा

Byjantaadmin

Mar 1, 2023

संजय राऊतांच्या हे विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे, या वक्तव्यावर सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे आमदार संतप्त झाले आहेत. त्यांनी विधीमंडळात संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. तसेच शिवसेनेच्या आमदारांनी चौकशीपूर्वीच राऊत यांना अटक करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे दिवसभरासाठी विधीमंडळाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे आमदार rohit pawar  यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर टीका केली. सत्ताधाऱ्यांना महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणे टाळायचे होते, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या विषयावर भर दिला. जनतेच्या प्रश्नांसाठी हा वेळ महत्त्वाचा असून तो वाया घालविला. त्यानंतर विधीमंडळावर कुणी वक्तव्य करीत असले तर त्याचा निषेध आहे. मात्र जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असतात, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.

rohit pawar म्हणाले, “सत्तेत असणाऱ्या लोकांना कुठल्याही महात्त्वाच्या विषयावर चर्चा करायची नव्हती. त्यांना माहीत होते की आम्ही विजेच्या विषयावर सभा त्याग करणार आहोत. त्या विषयावर प्रश्न विचारणार होतो. तो आम्ही विषय घेऊ नये, त्यामुळे वेगळ्याच विषयावर त्यांनी संपूर्ण दिवस घालवला. वास्तविक पाहता संपूर्ण दिवस येथे समान्य जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित होते.”

पुढे पवार यांनी आदेशानंतर तरी कामकाज सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले, “कुणीही विधानसभेवर बोलत असेल तर त्यांचा निषेधच आहे. मात्र विधानसभेच्या अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याबाबत आठ मार्चला निर्णय येणार आहे. या आदेशनंतर तरी विधीमंडळाचे कामकाज सुरू होणे अपेक्षित होते. मात्र सत्ताधाऱ्यांनी चर्चा करणे टाळले. त्यानंतर संपूर्ण दिवसच तहकूब केला.”

ठाकरे गटाचे नेते व खासदार  sanjay raut यांचे संसदेतील गटनेतेपद काढून घेण्याच्या हालचाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने सुरू केली आहे. शिंदेंच्या या राजकीय डावपेचावर राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

राऊत (Sanjay Raut) म्हणाले, शिंदे-भाजप सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांसारख्या २८ चोरांना क्लिनचीट दिली आहे. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष थोडीच सोडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत. अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो, अशी घणाघाती टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे विधिमंडळामध्ये जोरदार घमासान सुरू झाले.

शिंदे मुख्यमंत्री होताच भाजपच्या ८० ते ८५ लोकांमध्ये बंडाची तयारी पण..अजित पवारांचा गौप्यस्फोट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *