• Thu. May 9th, 2024

1 मार्चपासून बदलणार नियम! तुमच्या खिशावरही होईल परिणाम, अवश्य घ्या जाणून

Byjantaadmin

Mar 1, 2023

मार्च महिन्यात अनेक सण, उत्सव आहेत आणि त्यामुळेच अनेक सुट्ट्याही आहेत. मात्र त्यासोबतच मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक नियमांत बदल सुद्धा होणार आहेत. या नियमांबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जाणून घ्या मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेपासून कोणत्या-कोणत्या नियमांत बदल होणार आहेत.

LPG गॅस सिलेंडरचे दर

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर अपडेट केले जातात. फेब्रुवारी महिन्यात एलपीजीच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. 1 जानेवारी रोजी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, यावेळी मार्च महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या दरात बदल होऊ शकतात.

CNG दरात होऊ शकतात बदल

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG, CNG आणि PNG चे दर अपडेट होतात. फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने सीएनजीच्या दरात कपात केली होती त्यानंतर मुंबईत सीएनजीचा दर 87 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला होता. मात्र, दिल्लीत कोणतेही बदल झाले नव्हते. आता शक्यता वर्तवण्यात येत आहे की, या महिन्यात दिल्लीत सीएनसीच्या दरात बदल होऊ शकतात

बँक कर्ज महागणार?

नुकतीच आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली त्यानंतर अनेक बँकांकडून MCLR दरात वाढ होऊ शकते. अंदाज वर्तवण्यात येत आहे की, मार्च महिन्यात बँक लोन महागण्याची शक्यता आहे.

स्पेशल ट्रेन्स धावणार

1 मार्चपासून हजारो पॅसेंजर ट्रेन आणि 5 हजार मालगाड्यांच्या वेळापत्रक बदल केले जाण्याची शक्यता आहे. तसेच मार्च महिन्यात अनेक सण, उत्सव आहेत. होळी सणानिमित्त भारतीय रेल्वेकडून अनेक स्पेशल ट्रेन्स चालवण्याची शक्यता आहे. या संदर्भात भारतीय रेल्वे आपल्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देईल.

काशी विश्वनाथ मंदिरात आरती

वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात आरती महागणार आहे. या ठिकाणी मंगला आरतीसाठी भाविकांना पूर्वीपेक्षा 150 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. या ठिकाणी आधी आरतीसाठी 350 रुपये द्यावे लागत होते मात्र आता 500 रुपये द्यावे लागणार आहेत. यासोबतच सप्तऋषि आरती, श्रृंगार भोग आरती आणि मध्याह्न भोग आरतीच्या तिकीटासाठी 120 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी याची किंमत 180 रुपये होती जी आता 300 रुपये होईल. हा नवा नियम 1 मार्च 2023 पासून लागू होईल.

सोशल मीडिया पोस्ट

सोशल मीडियाच्या संदर्भात अनेक गोष्टींवर मार्च महिन्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इन्स्टाग्राम, फेसबूक आणि ट्विटरवर भडकाऊ पोस्ट करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई आणि मोठा दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यात १२ दिवस बँका राहणार बंद

मार्च महिन्यात १२ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार मार्च महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे

एटीएममधून मिळणाऱ्या दोन हजारांच्या नोटा होणार हद्दपार

एटीएममधून मिळणाऱ्या दोन हजारांच्या नोटा देखील आता बंद होणार आहे. त्यामुळे एटीएम मधून दोन हजार रुपयांची नोट आता मिळणार नाही. रेल्वेने देखील त्यांच्या मालगाड्या आणि प्रवासी गाड्यांच्या वेळात बदल केला आहे. तब्बल पाच हजार मालगाडी आणि प्रवाशी गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

शिंदे मुख्यमंत्री होताच भाजपच्या ८० ते ८५ लोकांमध्ये बंडाची तयारी पण..अजित पवारांचा गौप्यस्फोट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *