• Thu. May 9th, 2024

घरगुती सिलेंडर ५० रुपयांनी, तर व्यावसायिक सिलेंडर ३५० रुपयांनी महागला

Byjantaadmin

Mar 1, 2023

देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळला जात आहे. आता आणखी या महागाईत भर पडणार आहे. आज पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत.

LPG Price Hike: देशात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाच्या चटक्याबरोबर आता महागाईचे चटके देखील सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. आज पासून म्हणजेच १ मार्च पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. घरगुती सिलेंडरचे दर हे ५० तर व्यावसायिक सिलेंडर तब्बल ३५० रुपयांनी महाग झाले आहे. यामुळे इतर वस्तूंच्या किमती देखील वाढणार आहे.

या संदर्भात एएनआयने वृत्त दिले आहे. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ५० तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत ही ३५०.५० रुपयांनी वाढले आहे. राजधानी दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडरची किंमत ही २११९.५० तर घरगुती एलपीजी सिलिंडर ११०३ रुपयांना आता मिळणार आहे.

मुंबईत एलपीजीची किंमत १०५२.५० रुपयांवरून ११०२.५० रुपये, कोलकातामध्ये एलपीजीची किंमत १०७९ रुपयांवरून ११२९ रुपयांपर्यंत वाढली आहे. तर चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत १०६८.५० रुपयांवरून १११८.५० रुपयांपर्यंत वाढली आहे. तब्बल ८ महिन्यांनी सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत.

शिंदे मुख्यमंत्री होताच भाजपच्या ८० ते ८५ लोकांमध्ये बंडाची तयारी पण..अजित पवारांचा गौप्यस्फोट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *