• Tue. May 7th, 2024

काळ्या मुखपट्टी बांधून झाड तोडल्याचा निषेध

Byjantaadmin

Mar 31, 2023
काळ्या मुखपट्टी बांधून झाड तोडल्याचा निषेध.
ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी व्यक्त केला संताप
लातूर शहरातील औसा रोडवर आदर्श कॉलनी जवळ गुरुवारी पहाटे काही अज्ञात व्यक्तींनी एका मोठ्या झाडाच्या सर्व फांद्या छाटून झाड तोडण्याचा प्रयत्न केला.  ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त संबंधित अधिकारी यांना व्हॉट्सअप द्वारे माहिती देऊन त्यांच्याद्वारे कारवाई करावी अशी विनंती केली.
 त्यानंतर आज ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी तोडलेल्या झाडा समोर तोंडाला काळ्या मुखपट्ट्या बांधून झाड तोडण्याचा निषेध व्यक्त केला. शहरामध्ये ठिकठिकाणी झाड तोडणे, झाडांच्या खाली केमिकल टाकून झाडे जाळणे, झाडांच्या फांद्या मोडणं, झाडांच्या खाली कचरा जाळणे अशा विध्वंसक बाबी वारंवार होत आहेत, टीमचे सदस्य डॉ.भास्कर बोरगावकर यांनी अशा विध्वंसक कारवाई करणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.  झाडाखाली सावलीमध्ये गाडी लावू दिली नाही म्हणून दोन-तीन अज्ञात व्यक्तींनी रागाच्या भरात झाडांच्या सर्व फांद्या तोडल्या अशी चर्चा आजूबाजूला सुरू होती. झाड तोडण्याच्या अगोदर, फांद्या मोडण्याच्या अगोदर शेजारील सीसीटीव्ही कॅमेरा दिशा बदलण्यात आली होती असेही कळाले. यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *