• Sun. Apr 28th, 2024

नवीन नियम, हेडफोन न लावता व्हिडिओ पाहिल्यास ५ हजाराचा दंड, ३ महिन्याची जेलची शिक्षा

Byjantaadmin

Apr 30, 2023

नवी दिल्लीः Mobile New Rule: मोबाइल फोनचा वापर वाढला आहे. मेट्रो ट्रेन आणि बस मध्ये सर्व आपल्या मोबाइल फोनमध्ये व्यस्त आहेत. परंतु, काही लोक असे आहेत. जे बस, ट्रेन आणि पब्लिक प्लेसमध्ये जास्त फोनचा वापर करतात. तसेच मोठ्या आवाजात बोलत असतात. परंतु, आता एक नवीन नियम आला आहे. ज्यात तुम्ही बसमधून विना हेडफोनचा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला ५ हजार रुपयाचा दंड आणि ३ महिन्याची जेलची शिक्षा होऊ शकते.

मुंबईत नियम लागू
सध्या हेडफोन व्हिडिओ पाहण्यावरून नवीन नियम बनवण्यात आला आहे. हा नियम BEST म्हणजेच बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई एंड ट्रांसपोर्ट (BEST) ने जारी केला आहे. बेस्टने मोबाइल फोनच्या स्पीकरवर व्हिडिओ पाहिल्यास किंवा गाणे वाजवण्यावर या आठवड्यापासून बंदी घातली आहे. नवीन नियम वरून जनजागृती करण्यासाठी अधिसूचना करण्यात आली आहे.

का आणला नवीन नियम
मोबाइल फोनवरून नवीन नियम आणल्यामागे गोंगाट हे कारण आहे. सोबत प्रवाशाला असुविधा होऊ नये यासाठी नवीन नियम आणला आहे. त्यामुळे गोंगाट कमी करण्यासाठी नवीन नियम आणला आहे. बसमधून प्रवास करताना अनेक जण मोठ्याने आवाज करतात. त्याचा दुसऱ्याला नाहक त्रास होतो. त्यामुळे हा नवीन नियम आणला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *