• Tue. May 7th, 2024

नाना ‘ऑन दी स्पॉट’; म्हणाले, भाजप म्हणजे पाकिटमार..!

Byjantaadmin

May 5, 2023

भाजपच्या विरोधात नागरिकांमध्ये चीड आहे, केवळ असे समजून आपण निवडून येणार नाही. त्याकरिता प्रत्येकाने संघर्ष करण्याची गरज आहे. आपला प्रत्येक कार्यकर्ता जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. याकरिता प्रभागनिहाय अध्यक्षांची नियुक्ती लवकरच केली जाणार असल्याची घोषणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. (

ब्लॉक आणि प्रभाग अध्यक्षांनी आपली टीम तयार करावी आणि प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घ्याव्या. प्रत्येक प्रभागाची बैठक ही झालीच पाहिजे, असाही दम पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला. शहर काँग्रेस कमिटीची बैठक गुरुवारी (ता. ४ मे) देवडिया भवनात पार पडली. यावेळी तिकीट हवे असेल, तर देवडियात यावे लागेल असे नानांनी यावेळी सुनावले. सोबतच शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना बैठकांना दांडी मारणाऱ्या नेत्यांचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेशही पटोले यांनी दिले.

लाड खपवून घेणार नाही..

या बैठकीला माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे आदी नेते अनुपस्थित होते. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला छुपी साथ देणाऱ्या आणि देवडिया काँग्रेस भवनात बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्या नेत्यांचे लाड यानंतर खपवून घेणार नाही. अशा नेत्यांसह कार्यकर्त्यांवर ‘ऑन दी स्पॉट’ कारवाई करू, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

येणारा काळ कॉंग्रेसचाच..

पटोले म्हणाले, येणारा काळ काँग्रेसचाच आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व धनशक्ती भाजपने लावली होती. मात्र सर्वाधिक बाजार समित्या काँग्रेसने जिंकल्या आहेत. हे काँग्रेससाठी शुभ संकेत आहे. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भाजपच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. नागपूर महापालिकेत ओसीडब्ल्यूच्या माध्यमातून सार्वजनिक नळ बंद करण्यात आले आहेत. गोरगरिबांना सक्तीने विकत पाणी घ्यायला भाजपने भाग पाडले आहे. जी-२०च्या नावावर कोट्यवधी रुपये लुटवण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *