• Tue. May 7th, 2024

अधिकाऱ्यांना पाहून ओमराजे म्हणाले, योगा, व्यायाम करा, अन्यथा राजीनामे द्या…

Byjantaadmin

May 5, 2023

वाढलेल्या ढेऱ्या, डायबीटीज, शुगरच्या तक्रारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना योगा, व्यायाम करा, असा सल्ला खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) यांनी एका बैठकीत दिला. जर जमत नसेल तर राजीनामे द्या, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. पोकरा योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत समोर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या वाढलेल्या ढेऱ्या पाहून ओमराजे चांगलेच संतापले.

बीपी, शुगरवाल्यांनो जरा व्यायाम योगा करत जा, असा सल्ला देतांनाच जमत नसेल तर राजीनामा द्या, हे सांगायला देखील ते विसरले नाही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अंतर्गत विविध योजनेचा आढावा  omraje nimbalkar आमदार कैलास पाटील यांनी घेतला.

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील कृषी पर्यवेक्षक सगर यांचे नुकतचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांना देण्यात आली. याबद्दल दुःख व्यक्त करतांनाच त्यांनी उपस्थिती अधिकाऱ्यांनो आपली तब्यत सांभाळा. नियमित योगा, व्यायाम करा, असा सल्ला दिला.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची सर्व प्रकरणे ७ दिवसाच्या आत निकाली काढा, अशा सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही याचे खबरदारी घेण्याबाबतही त्यांनी सूचना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *