• Mon. May 6th, 2024

सततचा अवकाळी पाऊस मान्सूनच्या मुळावर उठला! हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली चिंता गंभीर

Byjantaadmin

May 6, 2023

पुणे : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. यंदा हिवाळ्यात महाराष्ट्रात थंडी जाणवली नाही. थंडी कधी आणि गेली हेच समजलं नाही. आता ऐन उन्हाळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या आणि देशाच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान बदलाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता हवामान तज्ज्ञांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.

cool summer can impact monsoon

ऐन उन्हाळ्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचं तापमान हे घसरलं आहे. पावसामुळे महाराष्ट्रात महाबळेश्वरसह विदर्भात काही ठिकाणी आणि देशाची राजधानी दिल्लीसह काही भागांमध्ये दाट धुकं पसरलं होतं. ऐन उन्हाळ्यात वातावरणात गारवा निर्माण झाल्याने आता हवामान तज्ज्ञांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. थंड उन्हाळ्यामुळे किंवा सततच्या अवकाळी पावसामुळे तापमान घसरल्याने मान्सूनवर त्याचा मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारताचा बहुतांश भूभाग उन्हाळ्यात तापण्याऐवजी थंड होण्याचा कल असेल. म्हणजेच यंदा होतंय त्यानुसार जमीन आणि समुद्र यांच्यातील तापमानाचं प्रवण कमी झालं आहे. आणि हवामानातील या बदलामुळे भारतात मान्सून लांबण्याची शक्यता आहे. साधारणतः भारतात मान्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होतो.

‘भारतात मार्च ते मे हा मान्सून पूर्व कालावधी आहे. हा काळ नैऋत्य मोसमी पावसाच्या निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो’, असं माजी सचिव डॉ. एम. राजीवन यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *