• Mon. May 6th, 2024

शेतमजुराच्या मुलाची कमाल, तब्बल १४ हजार विद्यार्थ्यांना मागं टाकलं,संस्कृतमध्ये टॉपर बनला

Byjantaadmin

May 6, 2023

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका शेतमजुराच्या मुलानं १४ हजार विद्यार्थ्यांना मागं टाकत संस्कृतमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षा परिषद बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ८२.७ टक्के गुण मिळवून मोहम्मद इरफान पहिला आला आहे. या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाचे दोन पेपर अनिवार्य आहेत. त्यामध्ये मोहम्मद इरफाननं प्रथम क्रमांक पटकावला आहे. इरफानला पुढं जाऊन संस्कृत विषयाचा शिक्षक व्हायचं आहे. इरफान सध्या १७ वर्षांचा असून १० आणि १२ वीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांमध्ये तो एकमेव मुस्लीम विद्यार्थी आहे.

मोहम्मद इरफानच्या वडिलांनी मुलाच्या यशाबद्दल भाष्य केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की संपूर्णानंद संस्कृत सरकारी शाळेची फी मी भरु शकत होतो. त्यामुळं या शाळेत प्रवेश मुलाचा प्रवेश घेतला होता. इरफानच्या वडिलांचं नाव सलाउद्दीन असं आहे. ते शेतमजुरी करतात. महिनाभरात त्यांना काहीच दिवस काम मिळतं. सलाउद्दीन यांना दिवसाला मजुरी केल्यानंतर ३०० रुपये मिळतात. मजुरी केल्यानंतर अवघे ३०० रुपये मिळत असल्यानं सलाउद्दीन म्हणाले की मी इरफानला खासगी किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही शाळेत पाठवू शकत नव्हतो. सलाउद्दीन त्यांच्या मुलासह चंदोली जिल्ह्यातील जिंदापूर गावात वास्तव्यास आहेत.
मोहम्मद इरफान हा सुरुवातीपासून अभ्यासात हुशार होता. संपूर्णानंद संस्कृत शाळेत प्रवेश घेतल्यापासून त्याला संस्कृत विषय आवडू लागला होता. अभ्यासाची आवड असल्यानं त्यानं इतर गोष्टींची तक्रार केली नाही, असं सलाउद्दीन म्हणाले. आमचं घर छोटं आणि कमी सुविधा असलेलं आहे. मात्र, मुलानं त्याच्या अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही, असं सलाउद्दीन म्हणाले. काही महिन्यांपूर्वी पक्कं घर बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळाल्याचं ते म्हणाले.
लोक भाषेला धर्माशी का जोडतात हे कळत नाही, असं देखील इरफानचे वडील म्हणाले. एखादा हिंदू व्यक्ती चांगलं उर्दू शिकू शकतो. तर, मुस्लीम व्यक्ती संस्कृत विषयात पारंगत होऊ शकतो. असं ते म्हणाले. मोहम्मद इरफानला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखनार नाही, असंही ते म्हणाले. इरफानला संस्कृत विषय अनिवार्य होता, इरफानला त्या विषयाची आवड निर्माण झाली. त्यातून त्यानं दहावी आणि बारावीला चांगले गुण मिळवले, असं सलाउद्दीन म्हणाले. संस्कृत भाषेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन पुढे त्याला संस्कृत विषयाचा शिक्षक व्हायचं आहे, असं सलाउद्दीन म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *