• Mon. May 6th, 2024

थेट विश्वास नांगरे पाटलांचा मेसेज आलाय म्हणून हुरळून जाऊ नका!

Byjantaadmin

May 6, 2023

सायबर गुन्हेगार नवनवे मार्ग अवलंबून फसवणूक करीत आहेत. एखाद्याचा मोबाईल हॅक करून किंवा सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून लुटण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. सायबर क्राईमबाबत एक आता मोठी बातमी समोर आली आहे.

आयपीएस अधिकारी व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांचे बनावट फेसबुक अकाउंट बनवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

स्वत: विश्वास नांगरे पाटील यांनी फेसबुक पोस्टमधून याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत.

या संबंधी विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या अधिकृत  FACEBOOK अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत या बनावट अकाऊंटची माहिती दिली आहे.

फेसबुक पोस्ट करत त्यांंनी लिहिले की, ”नमस्कार मित्रांनो, काही घोटाळेबाजांनी माझ्या नावावर बनावट खाते तयार केले आहे. ते माझ्या काही संपर्कांना खाली दिलेले संदेश पाठवत आहेत. मी तातडीने कारवाई करत आहे. परंतु कृपया प्रतिसाद देऊ नका किंवा कोणत्याही प्रकारची माहिती पाठवू नका. कारण हा फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे! धन्यवाद…”

CRIME  घटना घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांची टीम सातत्याने काम करत आहे. फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया अकाऊंट्सचा वापर करुन दिवसेंदिवस ऑनलाइन गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशात आता आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत देखील अशी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *