• Sat. May 4th, 2024

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिरोदी घेवून उध्दव ठाकरेंचे हात बळकट करुन याः संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण

Byjantaadmin

May 30, 2023

लातूर,ईडी,सीबीआय व खोके अशा आमिषाला बळी पडून महाराष्ट्रमध्ये उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात गुण्या गोविंदाने नांदणार्‍या महाविकास आघाडी सरकार भारतीय जनता पार्टी आणि मिंदे गटाच्या काही आमदारांनी षडयंत्र आखून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होण्यास भाग पाडले. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सत्तेच्या खुर्चीला चिटकून न बसता आपल्याच गद्दाराणी पाठीत खंजीर खुपसला आहे. मला सत्तेची गरज नाही मला गरज आहे ते सर्वसामान्य शिवसैनिकाची शिवसैनिक शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणार्‍या शिवसैनिकाच्या विश्वासावर मी पुन्हा एकदा शिवसेना उभी करणार, हा आत्मविश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे निश्चितच उद्धव ठाकरे यांच्या कार्याची पावती सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतलेली निर्णय कोरोना सारख्या महाभयंकर अशा महामारी मध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचे केलेले प्रामाणिक कार्य यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबाबद्दल प्रचंड सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे. नक्कीच तमाम शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे शिदोरी घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी नियोजनपूर्वक कामाला लागावे,असे आवाहन लातूर जिल्हा संपर्क प्रमुख माजी आ.रोहिदास चव्हाण यांनी केले.
लातूर जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या भालचंद्र ब्लड बँक सभागृहामध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने म्हणाले की, औसा आणि निलंगा या दोन्ही विधानसभा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या अथक अशा मेहनतीने एकजुटीने शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारी शिवसेना उभी करून गद्दार ४० आमदार भारतीय जनता पार्टीचे षडयंत्र राजकारण गाडून दोन्ही विधानसभेमध्ये शिवसेनेचे वाघ निवडून येतील येणार्‍या प्रत्येक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सोबत राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून लातूर महानगरपालिका,निलंगा व औसा नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील या गोष्टीचे नियोजन करून सर्वसामान्य शिवसैनिकाला सत्तेचा वाटेकरी करणार.पक्षात सर्वांचा योग्य मानसन्मान राखला जाईल,
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, हरिभाऊ सगरे, विष्णू साबदे, तालुकाप्रमुख बाबुराव शेळके, अविनाश रेशमे, तानाजी सुरवसे, भागवत वंगे, तसेच महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख डॉक्टर शोभाताई बेंजर्गे, सुनिता चाळक, महिला जिल्हा उपसंघटिका जया तउटगे, युवासेना जिल्हाध्यक्ष राहुल मातोळकर, माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, युवतीसेना जिल्हाध्यक्ष ऍड.श्रद्धा जवळगेकर, भास्करराव माने यांनीही मनोगत व्यक्त केले.
लातूर शहरातून अनेक मुस्लिम बांधवांसह. इस्माईल खान, शकुद्दीन तांबोळी, नासिर खान, मुस्तफा हनमुरे, अरिफ शेख, अल्ताफ मुल्ला, अजहर खान, इमरान खान, मनमाड खान, इसाक खान, अहमद खान, इरशाद खान,श्रीमान सावरगाव, हुसेन खान, मास शेख, अदनान खान, समीर खान, राजदार खान, अराफत खान, मोहम्मद शेख, इब्राहिम खान, अब्दुल रहीम, बाळू सावरगाव, अशा २६ लोकांनी,शिरूर अनंतपाळ तालुक्यातील व्ही एस पँथरचे अभंग घोलपे, अर्जुन कदम, अर्जुन सूर्यवंशी, उत्तम शिरसाठ, मनोज घोलपे, हनुमंत चव्हाण, तानाजी सूर्यवंशी,राहुल चव्हाण, बबलू कांबळे,,गुरुदेवी स्वामी, साक्षी सूर्यवंशी, पूर्णिमा स्वामी, कुमारी सचित्र साखरे,शितल हांडे,महिलांनी ही शिवसेनेत प्रवेश केला,
याप्रसंगी शिवसेनेचे बँक कर्मचारी सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा लातूर जिल्ह्याचे मार्गदर्शक सी.के. मुरळीकर, व्यापारी आघाडीचे बसवराज मंगरुळे, शहर महानगरप्रमुख विष्णू साठे, शिक्षक सेनेचे पठाण, सोमनाथ स्वामी, बजरंग जाधव, देवणी तालुका प्रमुख मुकेश सुडे, धनराज बिराजदार, महेश देशमुख, खंडू जगताप,, महिला उपजिल्हासंघटिका सुजाताई गायकवाड, कामगार सेना जिल्हा संघटिका प्रीतीताई कोळी, निलंगा तालुका महिला आघाडी रेखाताई पुजारी, पांढरे ताई माने, महानगर संघटक बालाजी जाधव, शहर प्रमुख रमेश माळी, विधानसभा संघटक माधव कलमुकले, उपशहर प्रमुख शिवराज मुळावकर, भास्करराव माने, हूच्चे नाना शेख, एस आर चव्हाण विधानसभा प्रमुख, बाळू दंडीमे, प्रदीप बनसोडे, प्रदीप उपासे,राजू कतारे, रोहित दोपारे,हनुमंत पडवळ, औसा उपतालुकाप्रमुख श्रीराम कुलकर्णी, आबा पवार,अण्णासाहेब मिरगाळे,सुनील नाईकवाडे, उपविभाग प्रमुख मनीष वाघमोडे, हिप्परगाव शाखाप्रमुख जयजयराम जगताप, शाखाप्रमुख मातोळे, अभिषेक जाधव, अमर जमादार, सुमित क्षीरसागर, शिव परुडकर, सलीम पटेल, सुधाकर मुगळे, विभागप्रमुख महादेव साळुंखे,लक्ष्मणराव घोणे, अशोक धुमाळ, गणेश गायकवाड तानाजी करपुरे, संतोष माने, अजय घोणे, शिवराम शिंदे, कृष्णा चेबळे,महेश चांदणे, शंकर गंगणे, कृष्णा जाधव,निलेश शिंदे, राहुल शिंदे, आकाश पवार,साक्षी सुरवसे,शीतल हंडे,शिवदत्त्त साखरे,राघवेंद्र जवळगेकर,रोहित पाटील,सूरज निर्फले,गणेश बेस्के व्यंकटेश मोरे,किशोर स्वामी,गजानन चौरे,बिरू बंडगर,शिवम चींचोलिकर,प्रकाश स्वामी,किरण पाटील,बालाजी पडूले, बशीर सय्यद, विजय शिखरे, सुनील आयवळे, संतोष पाटील, सिद्धार्थ सोनवणे, भगवान मोरे, उमेश अवतारे, छोटू कांबळे, राकेश कांबळे, प्रथमेश कांबळे, बालाजी चव्हाण, विजय पैठणे, संदीप बनसोडे, अभिषेक कांबळे, महादेव कांबळे, भगवान सातपुते, आकाश मस्के, कल्याण पाटील आदी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *