• Sat. May 4th, 2024

आंदोलक पैलवान त्यांचे पदक गंगेत करणार विसर्जित, केंद्र सरकारचा निषेध म्हणून आंदोलकांची भूमिका

Byjantaadmin

May 30, 2023

भाजपाचे आमदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sigh)  यांच्या विरोधात आंदोलन करणारे पैलवान (wrestlers) केंद्र सरकारचा निषेध म्हणून त्यांचे पदक गंगेत  विसर्जित करणार आहेत. पदक गंगेत विसर्जित केल्यावर इंडिया  गेटवर उपोषण करणार  आहेत.

Wrestlers Will throw Olympic Medals in the Ganges River Haridwar Bajrang Punia Hunger Strike Wrestlers Protest: आंदोलक पैलवान त्यांचे पदक गंगेत करणार विसर्जित, केंद्र सरकारचा  निषेध म्हणून आंदोलकांची भूमिका

पैलवान विनेश फोगाटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. मंगळवारी ( 30 मे) सर्व आंदोलक पैलवान आपले मेडल संध्यकाळी सहा वाजता हरिद्वार येथे गंगा नदीत विसर्जित करणार आहेत. दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारावाईनंतर दोन दिवसांनी विनेश फोगाटने हा निर्णय घेतला आहे.

आम्ही पदक का कमावले? 

विनेश फोगाटने ट्विटरवर एक पत्र शेअर केले आहे. या पत्रात विनेशने म्हटले आहे की, 28 मे रोजी आमच्यासोबत झालेला प्रकार सर्वांना पाहिला.  त्यानंतर या देशात आमच्यासाठी काहीच राहिले नााही. आजही आम्हाला तो क्षण आठवतो ज्या दिवशी आम्ही देशासाठी ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियशनशिप पदक देशासाठी कमावले. परंतु दोन दिवसापूर्वी झालेल्या प्रकारानंतर आता आम्हाला वाटते, आम्ही हे पदक का कमावले होते?

आमरण उपोषणचा इशारा

गंगा नदीत पदक विसर्जित केल्यानंतर आमच्या आयुष्यात करण्यासारखे काही उरलेच नाही. त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषण करणार आहे. राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेटवर युद्धात भारतीय सेनेच्या सैनिकांना जीव गमवावा लागला त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारले होते. आम्ही त्यांच्याइतके महान नाही परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना आमची भावना देखील त्या सैनिकांप्रमाणेच होती.

कुस्तीपटू आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की 

विनेश फोगट, तिची चुलत बहीण संगीता फोगट आणि साक्षी मलिक यांनी जंतरमंतर येथे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुस्तीपटू आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. हा सर्व प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसदेचं लोकार्पण करत असताना भर रस्त्यात सुरु होता. दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून कुस्तीपटूंना बसमध्ये भरून विविध ठिकाणी नेल्यानंतर, पोलीस अधिकाऱ्यांनी जंतर मंतरवरील खाटा, गाद्या, कुलर, पंखे, ताडपत्री तसेच इतर पैलवानांचे सामान काढून टाकत तंबूही उखडून टाकले होते, काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, आप, शेतकरी नेते, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुस्तीपटूंना देण्यात आलेल्या वागणुकीचा निषेध करत मोदी सरकारवर सडकून प्रहार केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *