• Sat. May 4th, 2024

महाराष्ट्र महाविद्यालयात १५ दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Byjantaadmin

May 31, 2023
महाराष्ट्र महाविद्यालयात १५ दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
निलंगाः येथील महाराष्ट्र महाविद्यालय आणि ग्लोबल टॅलेंट ट्रॅक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सॅाफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळेचे दि. १५ ते ३० मे, २०२३ या कालावधीत यशस्वी आयोजन संपन्न झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे-मुंबई सारख्या शहरात चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतात परंतू त्यांच्यामध्ये संवाद कौशल्य, समुहकार्य, सादरीकरण आणि विविध भाषेतून व्यक्त होण्याच्या आत्मविश्वासाची कमतरता असते. हीच बाब लक्षात घेऊन या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. यासाठी ग्लोबल टॅलेंट ट्रॅक, पुणे यांच्या वतीने अर्शद मिर्झा बेग हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहिले. या कार्यशाळेत इंग्रजीतून संवाद कौशल्य, गटचर्चा, समुहकार्य, सेमिनार प्रेझेंटेशन, मुलाखत तंत्र आणि पीपीटी प्रेझेंटेशन सारखी कॅारपोरेट कौशल्ये शिकवण्यात आली. या कार्यशाळेत एकुण ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क ठेवण्यात आली होती. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॅा. माधव कोलपूके यांनी पुढाकार घेतला तर डॅा. नरेश पिनमकर, प्रा. गिरीश पाटील, प्रा. संदीप सुर्यवंशी, प्रा. अक्षय पानकुरे, सिद्धेश्वर कुंभार, दिलीप सोनकांबळे, उमाजी तोरकड आणि गणेश वाकळे आदिंनी योगदान दिले. महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष आ. विजय पाटील निलंगेकर यांनी सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील नोकरीच्या संधींसाठी शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *