• Fri. Apr 26th, 2024

औसा ते बोरफळ रस्त्याचा कामाचा शुभारंभ; आ.अभिमन्यु पवारांच्या प्रयत्नामुळे तीस वर्षाचा प्रश्न निकाली

Byjantaadmin

May 31, 2023

औसा ते बोरफळ रस्त्याचा कामाचा शुभारंभ; आ.अभिमन्यु पवारांच्या प्रयत्नामुळे तीस वर्षाचा प्रश्न निकाली

वारकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील- सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर

औसा:औसाचा जुना बोरफळ रस्ता मागील अनेक दिवसापासून विविध कारणाने प्रलंबित होता. या रस्त्यावरून नाथ संस्थांची माग वारी पायी दिंडी पंढरपूर येथे जात असते दिंडीमध्ये पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना या रस्त्यावरून अतोनात त्रास होता म्हणून औसा ते बोरफळ रस्त्याचे काम व्हावे अशी 1974 पासून इच्छा होती. दरम्यानच्या काळात अनेक लोकप्रतिनिधींना या कामी पाठपुरावा करूनही हा रस्ता प्रलंबित होता परंतु विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नामुळे कायदेशीर बाबीची पूर्तता करून औसा ते बोरफळ रस्त्याचे काम आता पूर्ण झाल्यास वारकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील असे प्रतिपादन पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले….
रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता औसा ते बोरफळ रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता जाधव व श्री मुळजकर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार बाजपाई, ऍड मुक्तेश्वर वागदरे, बाजार समितीचे उपसभापती भीमाशंकर राचट्टे, नगरपालिकेचे गटनेते सुनील उटगे, बाजार समितीचे संचालक रमाकांत वळके, प्रा.सुधीर पोतदार, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, व्यंकट नाना मोरे, दिगंबर माळी, सुरेश स्वामी, नारायणराव माळी इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की औसा ते बोरफळ माघ वारी पायी दिंडीचा रस्ता व्हावा यासाठी माझी इच्छा होती कायदेशीर बाबीची पूर्णता करून या कामासाठी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून हा रस्ता होत असताना परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता विकास कामाला सहकार्य करावे असे आवाहन केले. हा रस्ता झाल्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांची व्यवस्था होणार आहे. त्यासोबतच तुळजापूर सोलापूर जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागणार नाही परिणामी वेळेची व इंधनाची बचतही होणार आहे. औसा विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला जाण्यासाठी शेत रस्ते, शिवरस्ते आणि पानंद रस्त्याची मोठी अडचण होती. आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यात समन्वय घडवून आणून हजारो किलोमीटरचे शेत रस्ते तयार करण्याचा राज्यामध्ये पॅटर्न निर्माण केला असून आगामी काळामध्ये मतदार संघात एकही रस्ता शिल्लक राहणार नाही यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू असे आश्वासन आमदार अभिमन्यू पवार यांनी याप्रसंगी बोलताना दिले. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते ऍड मुक्तेश्वर वागदरे आणि तालुका अध्यक्ष सुभाष जाधव यांनीही आमदार अभिमन्यू पवार यांच्या हातून होत असणाऱ्या विकास कामाचे त्यांनी कौतुक करून येणाऱ्या काळात लोकसभा विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीमध्ये जनतेने विकासाला साथ द्यावी असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी औसा आणि बोरफळ येथील शेतकरी तसेच वारकरी व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवरुद्र मुरगे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *