• Sat. May 4th, 2024

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सुचनेनंतर प्रशासन व ग्रामस्थाच्या सकारात्मक चर्चेतून निघाला तोडगा

Byjantaadmin

Jun 13, 2023

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सुचनेनंतर प्रशासन व ग्रामस्थाच्या सकारात्मक चर्चेतून निघाला तोडगा,

पिढ्यानपिढ्या अतिक्रमित मौजे गंगापूरच्या गंगादेवी मंदिर रस्त्याने घेतला मोकळा श्वास, रस्त्यासह सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात

लातूर प्रतिनिधी-लातूर तालुक्यातील मौजे गंगापूर येथील हेमांडपंथी असलेल्या गंगादेवी मंदिराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर संबंधित शेतरयानी अतिक्रमण केले होते आणि सदरील रस्ता पक्का करू देत नव्हते यामुळे पावसाळ्यात मंदिराकडे जाण्यास ग्रामस्थांना आडचन येत होती. या बाबत ग्रामस्थांनी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना ग्रामस्थांनी लेखीनिवेदनाद्वारे याबाबतची माहिती दिली. या नंतर माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मौजे गंगापूर येथे असलेल्या गंगादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काही शेतकऱ्यांनी केलेलं अतिक्रमण काढणे आणि रस्ता मोकळा करणे याबाबत संबंधित शेतकरी, मौजे गंगापूर येथील ग्रामस्थ व प्रशासन यांनी एकत्रित चर्चा करून सामंजस्यातून तोडगा काढावा अशा सूचना दिल्या होत्या. .

यावर प्रशासनाच्या वतीने मौजे गंगापूर या ठिकाणी ग्रामस्थ तसेच अतिक्रमण करणारे शेतकरी यांची नुकतीच एक बैठक संपन्न झाली या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आल्यानंतर संबंधित शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, व अतिक्रमण करणारे शेतकरी यांच्या समक्ष शासन नियमानुसार रस्त्याच्या जागेची शासन मोजणी करण्यात आली व यातून सामंजस्याने तोडगा काढत गंगादेवी मंदिरासाठी जाण्यास रस्ता मोकळा करून देण्यात आला. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विभागाअंतर्गत गतवर्षी प्राप्त झालेल्या ३ कोटी रुपयाच्या विकास निधीतून मौजे गंगापूर येथील गंगादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता, गावातील नाल्यावर पूल बांधकाम तसेच मंदिर सुशोभिकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे.

याबद्दल मौजे गंगापूर येथील ग्रामस्थानी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख तसेच प्रशासनाचे आभार मानले आहेत .

यावेळी प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी नागनाथ खंदाडे, तलाठी उत्तम बोयने, भूमी अभिलेख विभागाचे श्री. इगवे, तर मौजे गंगापूर ग्रामपंचायत सदस्य डॉ.सतीश कानडे, किरण शिंदे,तानाजी फुटाणे,बिभीषण शिंदे, भास्कर शिंदे, जानुमिया शेख,गुणवंत वाघे, शिवाजी नाथबोने, अण्णासाहेब शिंदे, ज्योतीराम चिवडे, बळीराम मिंड, महादेव मिंड,पप्पू धोत्रे, बालाजी धोत्रे, शांतीनाथ नाथबोने, महेबूब शेख, बाबुराव मिंड, दिलीप मिंड, विठ्ठल मिंड, तुळशीदास मिंड, सुधाकर मिंड,यशवंत मिंड यांच्यासह मौजे गंगापूरचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *