• Sat. May 4th, 2024

घनकचरा व्यवस्थापनासाठी २ गार्बेज टिप्परची खरेदी

Byjantaadmin

Jun 13, 2023

घनकचरा व्यवस्थापनासाठी २ गार्बेज टिप्परची खरेदी

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत लातूर मनपाचा उपक्रम

  लातूर/प्रतिनिधी:स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी लातूर शहर महानगरपालिकेकडून २ गार्बेज टिप्परची खरेदी करण्यात आली आहे. मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या उपस्थितीत  महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या टिप्परचे लोकार्पण करण्यात आले.

    लातूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मनपाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत.त्या अंतर्गत मनपाकडून सादर करण्यात आलेल्या ३२.६२ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास शासनाने मंजुरी दिली आहे.या प्रकल्पा अंतर्गत महानगरपालिकेकडून या २ गार्बेज टिप्परची खरेदी करण्यात आली आहे. शासनाकडून त्यासाठी निधी प्राप्त झाला आहे.प्रत्येकी तीन टन कचरा वाहतूक करण्याची या टिप्परची क्षमता आहे.शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी व शहर स्वच्छतेसाठी  त्यांचा उपयोग होणार आहे.

   मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी पालिकेतील महिला अधिकाऱ्यांना टिप्परचे लोकार्पण करण्याचा मान दिला.उपायुक्त मयुरा शिंदेकर व सहाय्यक आयुक्त  मंजुषा गुरमे यांनी श्रीफळ फोडून या टिप्परचे लोकार्पण केले. मनपा आयुक्तांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *